मुंबईः काल सुरु झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं आजचं दुसरं सत्र संपलं आहे. या बैठकीमध्ये काही ठराव घेण्यात आले असून पुढील रणनीती निश्चित करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी बैठकीत घेतलेले चार ठराव मांडले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसमोर भूमिका विषद केली.
उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, दिवसेंदिवस इंडिया आघाडी मजबूत होत आहे. त्यामुळे विरोधी गटामध्ये घबराहट पसरली आहे. आम्ही देशप्रेमी आहोत, त्यामुळे देशहिताचा नारा आम्ही दिलेला आहे. इथून पुढचा लढा देशाच्या हितासाठी असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीमध्ये चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. काही कमिट्या आजच्या बैठकीत गठीत करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात भ्रष्टाचार, हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. सबका साथ.. सबका विकास, असं ते म्हणाले होते, परंतु ज्यांनी साथ दिली त्यांना लाथ देण्याचं काम भाजपने केलं आहे.
''अर्ध्या ते रात्री घोषणा करत आहेत, हे चालू.. ते बंद. परंतु आता आपल्याला भयमुक्त भारतासाठी काम करायचं आहे. एलपीजी गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त केलं असेल परंतु मागच्या ९ वर्षांमध्ये कितीवेळा गॅसच्या किंमती वाढवल्या, हे बघावं लागेल. गॅस स्वस्त झाला खरा मात्र त्यावर शिजवणार काय? कारण सगळंच महाग करुन ठेवलं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
बैठकीत झालेले ठराव आदित्य ठाकरेंनी वाचून दाखवले
आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प
जागा वाटपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढून निवडणुकांना सामोरे जाणार
देशाच्या विविध भागांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर रॅली काढण्यात येणार
'जुडेगा भारत, जितेगा भारत' ही थीम विविध भाषांमध्ये मांडली जाणार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.