INDIA : 'इंडिया' आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची तारीख ठरली; समन्वय समितीमध्ये ठाकरेंचा समावेश होणार का?

uddhav thackeray sharad pawar
uddhav thackeray sharad pawarfile photo
Updated on

मुंबईः देशभरातल्या विरोधी पक्षांची तिसरी बैठक मुंबईमध्ये होणार आहे. या बैठकीची तारीख ठरली असून मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक संपन्न होईल. या बैठकीच्या अनुषंगाने उद्या शरद पवारांच्या उपस्थितीत एक प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आलीय.

देशभरातल्या २६ पक्षांनी एकत्र येत INDIA (इंडिया) आघाडीची स्थापना केली आहे. विरोधकांची पहिली बैठक पाटणा येथे आयोजित करण्यात आलेली होती. दुसरी बैठक बंगळूरू येथे मागील महिन्यात संपन्न झाली. त्याच बैठकीत विरोधी आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आले. बैठकीसाठी सोनिया गांधी यांचीही उपस्थिती होती.

uddhav thackeray sharad pawar
पावसाळी अधिवेशनाची सांगता! मुख्यमंत्र्यांनी मांडला लेखाजोखा, २७ पैकी १७ विधेयक मंजूर

बंगळूरु येथील बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये १२ जणांची समन्वय समिती स्थापन होणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती. या समितीची घोषणा मुंबईतील बैठकीमध्ये होणार आहे.

इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होईल. मुंबईतल्या सांताक्रूझमधील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच बैठकीमध्ये समन्वय समिती आणि आघाडीच्या चेअरमनची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. 'टीव्ही ९'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

uddhav thackeray sharad pawar
Nitin Chandrakant Desai Funeral : ना सलमान, ना अक्षय, ना किंग खान! अंत्ययात्रेला 'मराठी सेलिब्रेटींची' हजेरी

दरम्यान, या बैठकीमध्ये २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची व्यूव्हरचना, जागावाटप आणि समन्वय समितीच्या अधिकारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट या बैठकीसाठी अग्रेसर असल्याचं सांगितलं जातंय. समन्वय समितीमध्ये ठाकरेंची वर्णी लागणार की त्यांना इतर कोणती जबाबदारी मिळणार? हे बैठकीनंतर स्पष्ट होईल.

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीच्या अनुषंगाने उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. वरळीतल्या नेहरु सेंटर येथे ही बैठक संपन्न होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.