India Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना; 'या' 14 नेत्यांचा समावेश

INDIA Alliance Meeting Mumbai
INDIA Alliance Meeting MumbaiEsakal
Updated on

Mumbai News : मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीतून एक माहिती समोर येत असून समन्वय समितीची स्थापना झाल्याचं कळतंय.

'टीव्ही ९ मराठी'ने दिलेल्या वृत्तानुसार १४ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समन्वय समितीमध्ये शरद पवार यांचाही समावेश असल्याचं पुढे येत आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

INDIA Alliance Meeting Mumbai
One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शनचा अंदाज ? २ ऑक्टोबरला जाहीर होणार इंडियाचा किमान समान कार्यक्रम!

महाराष्ट्रामधून शरद पवार आणि संजय राऊत यांचा समन्वय समितीमध्ये समावेश असेल असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलेलं आहे. काही वेळात इंडिया आघाडीची पत्रकार परिषद होईल, त्यानंतर अधिकृत माहिती मिळेल.

केसी वेणूगोपाल, शरद पवार, संजय राऊत, एमके स्टालिन, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा, लल्लन सिंग, जावेद अली खान, डी.राजा, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, महेबूबा मुफ्ती, टी.आर. बालू या नेत्यांचा समन्वय समितीमध्ये समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकृत माहिती थोड्या वेळात समोर येईल.

INDIA Alliance Meeting Mumbai
Accident News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात; 2 ठार, 30 जखमी

दरम्यान, बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, सध्या भाजप सूडबुद्धीने काम करत आहे. देशातल्या तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत आहे. त्यामुळे आपल्याला अटकेची तयारी ठेवावी लागेल.

विरोधी पक्षातील नेत्यांना दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग होऊ शकतो. तरीही आपण सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्ला करावा, आपल्या काही सहकाऱ्यांवर छापे पडण्याची शक्यता आहे, असंही खर्गे यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.