Raju Shetti Nana Patole
Raju Shetti Nana Patoleesakal

'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींचं ठरलं! INDIA आघाडीत सहभागासाठी नाना पटोलेंचा थेट फोन; शेट्टी म्हणाले, आम्ही त्यांच्यात..

राजू शेट्टींच्या आघाडीतील सहभागाबाबत कॉंग्रेस आशावादी
Published on
Summary

देशातील दोन्ही आघाड्या या प्रश्नांबद्दल बोलतच नाहीत तर आम्ही कशाला त्यांच्यात जावे? आम्ही एकत्र लढा उभारू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : द इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूझिव्ह अलायन्स 'इंडिया'च्या (INDIA Alliance) मुंबईत होणाऱ्या बैठकीत राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षासह भाजपविरोधी आघाडीत सामील व्हावे, यासाठी संपर्क झाला होता. पण, हमी भाव आणि शेतकरी हक्कांबद्दल कोणताही शब्द मिळाला नसल्याने ते तिथे जाणार नाहीत!

हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यात येणार होते. भाजपविरोधी पक्षांची संख्या वाढावी असा प्रयत्न राष्ट्रीय स्तरावर सुरु आहे. त्यामुळे धर्मनिरपक्षतेच्या तत्वावर विश्वास असणाऱ्या शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्यात यावी यासाठी युध्दस्तरावर प्रयत्न झाले.

Raju Shetti Nana Patole
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली; काँग्रेस-भाजपात गेलेले 'हे' बडे नेते पुन्हा पक्षात परतणार?

मायावती यांचा बसपा, चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम या पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरुन प्रयत्न केले जात असताना महाराष्ट्रात शेट्टींशी संपर्क साधला जात होता. इंडिया बैठकीला हजर राहणार नाही असे सांगत राजू शेट्टी सकाळशी बोलताना म्हणाले, "कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गेल्या आठवड्यात सहभागाबद्दल सादर विनंती करणारा संपर्क साधला होता. पण, मी नकार दिला आहे.

Raju Shetti Nana Patole
'भविष्यात दंगल घडल्यास या दोन्ही नेत्यांना जबाबदार धरा'; मुश्रीफ, केपींविरोधात इचलकरंजीकर का झालेत आक्रमक?

स्वाभिमानी संघटनेचे कोणतेही निर्णय समितीच्या बैठकीत होत असतात. शिवाय, आज भाजप आणि भाजपेत्तर आघाड्या आमच्याशी संपर्क साधत असल्या तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणीही ठाम आश्वासन द्यायला तयार नाही. आम्ही १९ ऑगस्ट रोजी शेतमालाला हमीभावाच्या लढाईबाबत समविचारी संघटनांची बैठक घेतली होती. त्यात शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल विचार करण्यात आला. आम्ही त्याबद्दलचे आंदोलन तेज करणार आहोत.

Raju Shetti Nana Patole
NCP Crisis : अजितदादा गटातून कोणी आपल्यात येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मागच्या बाकावर बसवा; शरद पवारांचे आदेश

देशातील दोन्ही आघाड्या या प्रश्नांबद्दल बोलतच नाहीत तर आम्ही कशाला त्यांच्यात जावे? आम्ही एकत्र लढा उभारू, असं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली होती. पण, एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचा निर्णय अन् नंतर त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्याने नाराज झालेल्या संघटनेने आमच्या पत्राची साधी दखलही घेतली गेली नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर भाजपशी फारसे सख्य नसलेल्या माजी खासदारांशी अद्याप मविआचे सूर जुळलेले नाहीत. अर्थात राजू शेट्टी यांच्या आघाडीतील सहभागाबद्दल आशावादी असल्याचे मत कॉंग्रेसने व्यक्त केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.