देशातील सुमारे 39 टक्के नागरिकांची गेल्या 3 वर्षांत ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा लोकलसर्कल या संस्थेने एका सर्वेक्षणात केला आहे.
- केदार शिंत्रे
मुंबई - लोकलसर्कल या संस्थेने एका सर्वेक्षणात देशातील सुमारे 39 टक्के नागरिकांची गेल्या 3 वर्षांत ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. फसवणूक झालेल्यापैकी केवळ 24 टक्के कुटुंबांना त्यांचा निधी परत मिळाला असल्याचा लोकल सर्कलने अहवालात म्हटले आहे.
लोकल सर्कल संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 331 जिल्ह्यांतील सुमारे 32000 नागरिकांचे मत नोंदवले आहे. ज्यात 66 टक्के पुरुष आणि 34 टक्के महिला आहेत. सर्वेक्षणात सुमारे 39 टक्के प्रतिसादकर्ते मुंबई दिल्ली सारख्या महानगरामधील होते. 61 टक्के नागरिक मध्यम छोट्या शहरातून आणि ग्रामीण जिल्ह्यांतील होते.
70% तक्रारीचे निवारण रखडले
सर्वेक्षणात 11305 नागरिकांना फसवणुकीनंतर फसवलेली रक्कम परत मिळाल्याचे नोंदवले आहे. अशा प्रकारे एकूण 24 टक्के मत नोंदवलेल्या नागरिकांना रक्कम परत मिळाल्याचे अहवालात स्पष्ट होत आहे. तर 70 टक्के व्यक्तींनी त्यांच्या तक्रारीचे कोणतेही निराकरण झाले नसल्याच मत सर्वेक्षणात नोंदवले आहे.
या मध्ये 41 टक्के लोकांनी प्रकरण अद्याप प्रलंबित आहे असल्याचे सूचित केले. 17 टक्क्यांनी असहाय्य वाटत असल्याचे मत दिले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी 12 टक्के लोकांनी तक्रारही न करण्याचा निर्णय घेतल्याचे कबूल केले आहे आणि 6 टक्के स्पष्ट उत्तर दिले नसल्याचे सर्वेक्षांत सांगितले आहे.
आशादायक बाब
लोकलसर्कलने केलेल्या गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणातून मिळालेल्या प्रतिसादाचा तुलनात्मक अभ्यास दर्शवितो की मागील 3 वर्षांच्या तुलनेत 2023 मध्ये आर्थिक फसवणुकीची तक्रार करणाऱ्या कुटुंबांची टक्केवारी किंचित कमी झाली आहे. आशादायक बाब ही की ज्या व्यक्तींनी आर्थिक फसवणुकीची तक्रार केली आहे आणि त्यांचा निधी परत मिळवू शकले आहेत त्यांची टक्केवारी 2022 मध्ये 17 टक्क्यांवरून 2023 मध्ये 24 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
मुंबईतील परिस्थिती
मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 26.87 टक्क्यांनी वाढ झाल्याचे मुंबई पोलिसांच्या आकडेवारीत दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत मुंबई पोलिसांनी1205 सायबर गुन्ह्यांची नोंद केली असून 135 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 92 गुन्ह्यांची उकल पोलिसाना करण्यात यश आले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 2022 साळच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत 952 गुन्हे दाखल झाले होते. त्यात 61 गुन्हे उघडकीस आले असून 84 जणांना अटक करण्यात आली होती.पोलिसांच्या आकडेवारीनुसार या वर्षात सायबर गुन्ह्यांची नोंद झालेली सर्वाधिक प्रकरणे ऑनलाइन फसवणूक 606, त्यानंतर बँक कार्ड फसवणूक 394 आणि अश्लील ईमेल प्रकरणे 76 नोंदवली गेली आहेत.
8 श्रेणीत वर्गीकरण
सायबर गुन्ह्याची आठ श्रेणीमध्ये वर्गीकृत केली गेली आहे. नोकरीचा बहाण्याने फसवणूक 65, ऑनलाइन खरेदी 48, बनावट वेबसाइट्स 31, गुंतवणूक 23, कर्ज 18, कस्टम गिफ्ट्स 17 आणि क्रिप्टो करन्सी फसवणूक 8 यांच्याशी संबंधित आहेत. याशिवाय, या वर्षी पहिल्या 3 महिन्यात बनावट सोशल मीडिया प्रोफाइल/मॉर्फिंग ईमेल/एसएमएसची 38 प्रकरणे नोंदवण्यात आली.
त्यानंतर सेक्सटोर्शन 17, हॅकिंग 13, फिशिंग/मॅन-इन-मिडल अटॅक/स्पूफिंग मेल 13 , डेटा चोरी 7 आणि पोर्नोग्राफी 3 प्रकरणे नोंदवले आहे. पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे. विमा/ भविष्य निर्वाह निधी फसवणूक, वैवाहिक फसवणूक आणि कर्ज फसवणूक या प्रकरणांमध्ये यावर्षी घट होत चालली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.