INDIA Mumbai Meeting Today
मुंबई- इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक असून त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. त्याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू-काश्मिरचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यावर टीका केली होती. आज त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला, अशी टीका केसरकर यांनी केली.
बाळासाहेब ठाकरेंचे विचार उद्धव ठाकरे पायदळी तुडवत आहेत. उद्धव ठाकरेंना पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले असते तर त्यांनी युती केली असती. २०१४ मध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, त्यावेळी शरद पवारांनीच भाजपला बाहेरुन बिनशब्द पाठिंबा दर्शवला होता. इंडिया आघाडीचे आलेले नेते बाळासाहेबांच्या स्मारकावर जाऊन त्यांना वंदन करणार आहेत का? असा खोचक सवा केसरकरांनी केला.
सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे का? मी पक्ष विसर्जित करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही, असं बाळासाहेब म्हणाले होते. मला एका दिवसाचा पंतप्रधान करा मी जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द करीन असं बाळासाहेब म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंची ३७० कलमावर चर्चा करण्याची हिंमत आहे का? असा सवाल केसरकरांनी केला.
आज जगातील सर्व देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. पाकिस्तानची जनता देखील पंतप्रधान मोदी यांचे नाव घेते. अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य सुरु आहे. आज मेक इन इंडियाच्या घोषणेखाली शस्त्रास्त्र निर्मिती भारतात होऊ लागली आहे. अनेक देश भारतात गुंतवणूक करत आहेत. इंधनाचे दर आम्ही सत्तेत आल्यास कमी केले, असं ते म्हणाले.
जीडीपीमध्ये भारताने नवव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. इंडिया आघाडीला घाबरुन भाजपने गॅस सिलिंडरचे भाव कमी कले असं म्हणणं हास्यास्पद आहे. देशात लोकशाही आहे म्हणून तर इतक्या राज्यात तुमचे सरकार येऊ शकले. UPA म्हणजे भ्रष्टाचार करणारी आघाडी म्हणून त्यांनी नाव बदललं. तुम्हाला ३७० हटवल्याचं मान्य नाही, असं म्हणत त्यांनी सडकून टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.