Maharashtra Din : जयंत नाडकर्णी : मालदीवचं बंड भारतीय सैन्याने कसं मोडून काढलं ?

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी नाडकर्णी यांची आयएमएमटीएस ‘डफरीन’ या व्यापारी नौदल प्रशिक्षण जहाजावर प्रशिक्षणासाठी निवड झाली.
jayant nadkarni
jayant nadkarnisakal
Updated on

मुंबई : संरक्षण क्षेत्रात विविध क्षेत्रांत विविध पदांवर उत्तम कामगिरी केलेले जयंत गणपत नाडकर्णी यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे बालपण गिरगावात गेले.

वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी नाडकर्णी यांची आयएमएमटीएस ‘डफरीन’ या व्यापारी नौदल प्रशिक्षण जहाजावर प्रशिक्षणासाठी निवड झाली. ‘डफरीन’वर सोळा वर्षांच्या मुलांनाच प्रवेश देण्याचा नियम होता. पण अपवाद म्हणून नाडकर्णी यांना १४व्या वर्षीच प्रवेश मिळाला.

तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘एक्स्ट्रा फर्स्ट क्लास सर्टिफिकेट’ ही  ‘डफरीन’वरील सर्वोच्च पदवी मिळविली. फेब्रुवारी १९४९ रोजी त्यांची भारतीय नौसेनेसाठी निवड झाली. (indian navy officer admiral jayant nadkarni stories of defence maldives Rebellion )

jayant nadkarni
Maharashtra Din : पंडिता रमाबाई : आनंदीबाई जोशींच्या आधी रमाबाईच डॉक्टर झाल्या असत्या पण.....

मार्च १९४९ ते मे १९५३ मध्ये प्रशिक्षणासाठी नाडकर्णी यांना इंग्लंडमधील डार्टमाउथ येथील ‘रॉयल मरीन नेव्हल कॉलेज’मध्ये पाठवण्यात आले. भारताने ब्रिटनकडून खरेदी केलेल्या आयएनएस गंगा या युद्धनौकेवर त्यांची दिशादर्शक अधिकारी (नेव्हिगेशन ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाली.

जुलै १९५५ मध्ये त्यांना दिशादर्शनातील विशेष अभ्यासक्रमासाठी पुन्हा ब्रिटनला, रॉयल मरीन नेव्हल कॉलेजला पाठविण्यात आले. त्या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवून मार्च १९५६ मध्ये भारतात परतल्यावर आय.एन.एस. तीर या फ्रिगेट गटातील युद्धनौकेवर त्यांची नेव्हिगेशन ऑफीसर म्हणून नियुक्ती झाली.

३ नोव्हेंबर १९८८ रोजी मालदीव बेटांवर बंडखोरांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गयूम यांचे सरकार उलथून टाकण्याचा सशस्त्र प्रयत्न केला. या बंडात श्रीलंकेतील अतिरेकी सैनिक म्हणून सामील झाले होते. गयूम यांच्या मागणीनुसार भारताने मालदीवला मदतीचा हात दिला.

jayant nadkarni
Maharashtra Din : '२ लाख सुनांची एकच आई' असं कमलाबाई ओगले यांना का म्हणतात ?

बंड सुरू झाल्यापासून अवघ्या १२ तासांत भारतीय सेनादलांचे दीड हजाराहून अधिक छत्रीधारी सैनिक (पॅराट्रूपर्स) भारतीय वायुसेनेच्या मदतीने मालदीवमध्ये उतरले आणि पुढील काहीच बंड मोडून काढण्यात भारतीय सैन्याला यश आले. तेथे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात आली.

काही बंडखोरांनी मालदीवच्या एका मंत्र्याला ओलीस धरले होते. ते सर्वजण जहाजावरून पळून गेले. भारतीय नौदलाने पुढील ४८ तासांत हिंदी महासागरात बंडखोरांना ताब्यात घेतले.

मालदीवच्या बंडखोरांविरुद्धच्या या मोहिमेला ‘ऑपरेशन कॅक्टस’ असे नाव देण्यात आले होते. यात जयंत नाडकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

निवृत्तीनंतर नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले व संरक्षण क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.