'मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा', रेल्वे भरतीची जाहिरात शेअर करत राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Raj Thackrey Post: भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
Raj Thackrey Post
Raj Thackrey Post Esakal
Updated on

भारतीय रेल्वे विभाग 'सहाय्यक लोको पायलट'च्या (Assistant Loco Pilot) विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण ५६९६ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय रेल्वे लोको पायलट भारती २०२४साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून वृत्तपत्राद्वारे जाहिराती देखील देण्यात आल्या आहे. दरम्यान मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत या भरतीसाठी तरुणांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मनसैनिकांना केले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या भरतीच्या जाहीरातीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत मनसैनिकांना आवाहन केलं आहे. जास्तीत जास्त मराठी तरूण तरूणींना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मनसेच्या शाखांवर, कार्यालयांमध्ये या संबधीचे तपशील लावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackrey Post
Rahul Narwekar: राहुल नार्वेकर यांना दिल्लीत मोठी जबाबदारी; ओम प्रकाश बिर्ला यांनी केली घोषणा

राज ठाकरे यांची एक्स पोस्ट काय?

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे.

अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.

Raj Thackrey Post
Bhujbal on CM Shinde: "आता शिवसेना सोडणं सोप आहे"; मराठा आरक्षणावरुन भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप अन् टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट IndianRailways.gov.in ला भेट द्यावी. उमेदवारांनी होमपेजवरील लोको पायलट भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.