Indore bus accident : चालकाचं नियंत्रण सुटले अन्...; वाचा नेमकं काय घडलं

मध्य प्रदेशातील इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात घडला.
Indore bus accident : चालकाचं नियंत्रण सुटले अन्...; वाचा नेमकं काय घडलं
Updated on

जळगाव/अमळनेर : मध्य प्रदेशातील इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला धार जिल्ह्यातील खलघाट येथे मोठा अपघात घडला. बस नर्मदा पुलावरुन नदीत कोसळल्याने १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. बस जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची असल्याची खात्री पटली आहे. सकाळी १०च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. (Indore-Pune MSRTC ST bus fell into Narmada river 13 killed in accident Latest Marathi News)

Indore bus accident : चालकाचं नियंत्रण सुटले अन्...; वाचा नेमकं काय घडलं
Video : Eknath Shinde यांच्या कार्यक्रमात अशी कुठली घटना घडली ?

म.प्र. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने १५ जणांना वाचविण्यात यश मिळविले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. या बसवर अमळनेर आगाराचा चालक चंद्रकांत एकनाथ पाटील ड्युटीवर असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Madhya Pradesh ST Bus Accident)

खलघाट संजय सेतू पुलावरून नियंत्रण गमावल्याने बस २५ फूट खोल असलेल्या पुराच्या पाण्याने भरलेल्या नदीपात्रात कोसळली. यानंतर तातडीने मदत कार्य सुरु करण्यात आले. अॅम्बुलन्सद्वारे धामनोद सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी नेण्यात आले आहे. ३० ते ३५ प्रवासी बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

विभाग नियंत्रकांचा दुजोरा

या दुर्घटनेला एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर तसेच अमळनेरच्या आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी दुजोरा दिला.

म.प्र.तील बलकवाडा येथील खलटाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नर्मदा नदीच्या पुलावर ही घटना घडली आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Indore bus accident : चालकाचं नियंत्रण सुटले अन्...; वाचा नेमकं काय घडलं
Ramnagar Accident News : उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, 9 ठार

इंदूर- पुणे प्रवास

इंदुरहून ही बस पुण्याकडे येत होती. मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पुलावरून बस नर्मदा नदीत कोसळली. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत १२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर १५ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. नर्मदा नदीच्या पुलावर ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तपासानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

Indore bus accident : चालकाचं नियंत्रण सुटले अन्...; वाचा नेमकं काय घडलं
अमेरिकन तरुणीच्या अपहरणाचा २४ तासांत छडा, कहाणी ऐकून दिल्ली पोलिस आवाक्

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.