Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

indurikar maharaj
indurikar maharajesakal
Updated on

प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे . त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोराकर महाराजांना दिलासा दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकार औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.

प्रकरण काय आहे?

विनोदी किर्तनासाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी लिंगभेदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी सम तारखेला आणि विषय तारखेला शरिरसंबंध आल्यानंतर कसा मुलगा किंवा मुलीचा जन्म होतो याबद्दल विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

indurikar maharaj
Ajit Pawar : सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार… ; अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गंभीर आरोप

अडचणी वाढणार...

तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण जेएमएफसी कोर्टात चाललं, त्यानंतर कोर्टाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुढे हे कोर्ट सेशन कोर्टात गेलं. सेशन कोर्टात हा गुन्हा रद्द करण्यात आला.

त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्य शासनाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली. त्यानंत औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात आज या प्रकरणात निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

indurikar maharaj
Biparjoy In Pakistan : चक्रीवादळ पोहोचले कराची किनाऱ्यावर; नागरिकांची धांदल, पाक प्रशासन झोपेत? | Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.