'कंगना जे बोलली ते द गार्डियनमध्ये लिहिले गेले'

प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले यांनी कंगना राणावतच्या वादग्रस्त विधानावर मांडले मत
Ram Bhogale
Ram Bhogaleesakal
Updated on

औरंगाबाद : देशाला १९४७ मध्ये भीक मिळाली होती. खरे स्वातंत्र्य भारताला २०१४ मध्ये मिळाले आहे, या अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) वादग्रस्त विधानावर सर्वत्र टीका होत आहे. अभिनेता विक्रम गोखले यांनीही कंगनाच्या विधानाचे समर्थन केले आहे. या वादात औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती राम भोगले (Ram Bhogale) यांनी उडी घेतली आहे. भोगले म्हणतात, कंगना जे बोलली ते १८ ऑगस्ट २०१४ मध्ये 'द गार्डियन'मध्ये लिहिले गेले.

Ram Bhogale
प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार

तिने (कंगनाने) वापरलेले शद्ब फार निष्ठूर नसतील. पण दुसरीकडे 'द गार्डियन'चे थोडे सौम्य असेल. पण दोघांनीही एकच विचार व्यक्त केले. आपण मानसिकरित्या वसाहतिक परंपरेतून स्वातंत्र होत आहोत. आता आपण ती वस्तुस्थिती स्वीकारायला हवीच, असे भोगले आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.