केंद्र शासनाच्या पोषण ट्रॅकर या संगणक आज्ञावलीतील तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांच्या माहितीची द्विरुक्ती होत होती.
माळीनगर (सोलापूर) : केंद्र शासनाच्या (Central Government) पोषण ट्रॅकर या संगणक आज्ञावलीतील तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांच्या (Malnourished Children) माहितीची द्विरुक्ती होत होती. उंची व वजनाच्या अनुषंगाने मुलांचे तीव्र कुपोषित, अतितीव्र कुपोषित व सुपोषित वर्गीकरणामध्ये देखील मोठ्या प्रमाणात चुका होत होत्या, असे महिला व बालविकास विभागाने (Department of Women and Child Development) स्पष्ट केले आहे.
पोषण ट्रॅकरनुसार महाराष्ट्रात 1.57 लाख तीव्र कुपोषित (MAM) आणि 4.58 लाख अतितीव्र कुपोषित (SAM) असून हा आकडा भारतात सर्वाधिक असल्याबाबत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रसारमाध्यमात 7 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झाला होता. तीव्र कुपोषित व अति तीव्र कुपोषित मुलांच्या आकडेवारीत महाराष्ट्र अग्रेसर या वृत्तातील आकडेवारी ही जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या त्रैमासिक कालावधीतील आहे. केंद्र सरकारच्या पोषण ट्रॅकरच्या आज्ञावलीतील तांत्रिक दोष दूर करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने 9 मार्च 2021 आणि 9 सप्टेंबर 2021 रोजीच्या पत्रान्वये तसेच 5 मार्च, 8 मार्च, 28 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्येही सदर दोष दूर करण्याबाबत केंद्र शासनास विनंती केलेली आहे. आज्ञावलीतील सदर दोष केंद्र शासनानेही मान्य केले असून ते दूर करण्याबाबतची कार्यवाही केंद्र शासन स्तरावरून सुरू असून आज्ञावलीतील जे दोष महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिल्याबाबत व पोषण ट्रॅकर ऍपचा वापर मोठ्या प्रमाणात केल्याबाबत केंद्र शासनाकडून राज्य शासनाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच संगणक आज्ञावलीतील तांत्रिक दोषामुळे कुपोषित मुलांच्या माहितीची द्विरुक्ती पुन्हा होणारी नाही याबाबत आश्वासित केले आहे.
राज्य शासनाने तांत्रिक दोष निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र शासनाने सदर ऍपमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर सुधारित आकडेवारी प्राप्त झाली आहे. या दोन्ही आकडेवारीमध्ये असणारी तफावत स्पष्ट दिसत आहे. राज्यातील अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीवरून दिसून येते की, पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर होता.
केंद्र सरकारने ऍपमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर प्राप्त झालेली सुधारित आकडेवारी-
कुपोषणाची श्रेणी : प्रसारमाध्यमातील आकडेवारी 10 नोव्हेंबर 2021 रोजीची आकडेवारी
तीव्र कुपोषित : 157000 : 6760
अतितीव्र कुपोषित : 458000 : 6526
केंद्र सरकारच्या पोषण ट्रॅकरमध्ये कुपोषित बालकांची दिसून आलेली आकडेवारी आणि त्यातील तफावत ही आज्ञावलीतील तांत्रिक दोषामुळे निर्माण झालेली होती. ही बाब केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानं त्यांनी केलेल्या दुरुस्तीनंतर आधीची आकडेवारी आणि आताची आकडेवारी यातील फरक दिसून येत आहे. वास्तविक राज्य सरकारच्या वतीने विशेष अभियान राबवून कुपोषित बालकांच्या योग्य आकडेवारीबाबत अतिशय जागरूकपणे नोंद घेण्याचे काम केले आहे. त्यामुळे सॅम आणि मॅममधील बालकांवर योग्य उपचार करणे राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाला शक्य होत आहे.
- अॅड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.