नाशिक : ज्येष्ठ लेखक आणि संपादक गिरीश कुबेर यांच्यावर आज नाशिक येथील साहित्य संमेलनामध्ये संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक करण्यात आली आहे. त्यांनी लिहलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. या पुस्तकात कुबेर यांनी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा ठपका अनेकांनी ठेवला आहे. अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना, गट आणि लोकांकडून पुस्तकारावर बंदी आणण्याची देखील मागणी केली होती.
काय होते आक्षेप?
गिरीश कुबेर यांनी आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदेंची बदनामी केली, असं संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजी महाराज यांनी देखील पत्र लिहून लेखक कुबेर यांचा जाहीर निषेध नोंदवला होता. या पुस्तकावर कायमची बंदी आणावी अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. या पुस्तकाचे प्रकाशक HarperCollins Publishers यांना देखील या पुस्तकाच्या प्रती बाजारातून मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, HarperCollins Publishers प्रकाशन संस्था ही आंतरराष्ट्रीय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी आणायची असल्यास त्याबाबत काही मर्यादा आहेत.
पुस्तकावर कुणी कुणी नोंदवलाय आक्षेप?
काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी या पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली होती. ते म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करण्याचं काम आजही काही कथा, कांदबऱ्या आणि पुस्तकांच्या माध्यमातून केलं जात असून गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाच्या रूपात पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण मराठी जनतेच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, असं त्यांनी म्हटलंय. सरकारनं या पुस्तकाबाबत नोंद घ्यावी आणि ‘रेनिसान्स स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमोल मिटकरी यांनी देखील याबाबत तपासणी करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील या पुस्तकातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी गिरीश कुबेर यांच्या या वादग्रस्त पुस्तकाचा फोटो टाकून 'रिडींग दिस इंटरेस्टिंग बुक' असं लिहलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.