Maharashtra News : सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीवर रशियन बनावटीच्या राज्यातील पहिल्या स्प्रिंगर पुलाला रविवारी (ता. १७) पडलेल्या भगदाडानंतर व पुलाखालील भराव वाहून गेल्यावर तत्काळ पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.
पुलाची परिस्थिती तत्काळ सुधारण्यासाठी बुधवारी (ता. २०) नाशिक येथून पुलाच्या संदर्भातील तज्ज्ञ पाहणीसाठी येणार असल्याची माहिती अभियंता प्रवीण साळुंखे यांनी दिली.
सोनगीर ते शहादा या राष्ट्रीय महामार्गावरील धुळे, नंदुरबार या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलावर रविवारी दुपारी अचानक मोठा खड्डा पडला. हळूहळू रात्रीतून खड्डा वाढतच गेला. (Inspection of first springer bridge in state by collapse experts today maharashtra news)
(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)
तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पुलाखालील टाकरखेडा गावाच्या दिशेने असलेला भराव वाहून गेल्याने सकाळच्या सुमारास सहा मीटरचा खोल खड्डा, तर आठ मीटर लांबी व तीन मीटर रुंदीची तीन भगदाडे पडली. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
राज्यातील पहिला स्प्रिंगर पूल
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील सारंगखेडा येथील तापी नदीवर पहिला स्प्रिंगर पूल आहे. हा पूल नंदुरबार व धुळे जिल्ह्यांना जोडणारा असून, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, शहादा, धडगाव या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक एकला जोडण्यात आला.
असा आहे पूल...
१९५२ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले होते. १९५९ व १९६७ मध्ये पूर आला होता. पुलाचे अंतर ७०० मीटर असून, ११ खांब आहेत. पुलाची उंची २१.३४ मीटर आहे. उच्चतम पाण्याची पातळी ४०० फूट आहे. त्या वेळी रशियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या पुलाच्या कामावर एक हजार ५०० मजुरांनी काम केले आहे. यासाठी ३६ लाख रुपये खर्च झाला होता. पुलाच्या प्रत्येक खांबाच्या वरच्या भागाला स्प्रिंग लावले आहे.
त्यामुळे वाहने चालताना पूल मागे-पुढे होतो. हा पूल राज्य महामार्गाला जोडलेला होता. तो राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केला आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्यापासून त्या दृष्टीने कोणतेही ठोस काम या मार्गावर झाले नाही. पुलावरील संरक्षक कठडे, पिलर, जॉइंट यांची दुरवस्था झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२०१९ मध्ये भराव...
१९६८ मध्ये महापुरानंतर पुलाची समस्या वाढली होती. रोलर बेअरिंगची समस्या जाणवली होती. त्या वेळी संबंधित विभागाने न्यूमॅटिक जॅक वापरून नदीपात्रात न उतरता बेअरिंग गाळे उचलून पुलाची दुरुस्ती केली होती. त्यानंतर २००६ च्या महापुरानंतर पुलाच्या बेअरिंगमध्ये ग्रेसिंग वापरून दुरुस्ती केली होती. त्यानंतर टाकरखेडाकडील भागाकडे २०१९ मध्ये पुलाचा भराव केला होता. २८ सप्टेंबर २०२१ ला पुलाचा भराव वाहून गेला. या कामाची चौकशीची मागणी झाली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
‘‘पुलाची परिस्थिती तत्काळ सुधारण्यासाठी संबंधित विभागामार्फत पुलाच्या खालून व वरून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने परिस्थिती पाहून नाशिक येथे फोटो शूट करण्यात आले आहेत. लवकर कामासाठी इस्टिमेट, लेआऊट तयार करण्यात येणार आहे. उद्या नाशिक येथून पुलासंदर्भातील तज्ज्ञ येणार आहेत.
पुलावर सहा मीटरचा खोल खड्डा तर आठ मीटर लांबी व तीन मीटर रुंदीचे तीन भगदाडी पडले आहेत. या कामासाठी रात्रंदिवस युद्धपातळीवर काम केल्यावर तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तापी नदीच्या पात्रात पाणी वाढलेले असल्याने ड्रोनच्या सहाय्याने खालच्या भरावाच्या भागाचे फोटो घेतले आहेत. त्यानुसार कामाचे नियोजन करण्यात येईल.’’ - वीण साळुंखे, अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.