Sharad Pawar: 'President Of India' च्या ऐवजी 'President Of Bharat'? पवारांनी मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला

G20च्या निमंत्रण पत्रिकेवर 'President Of India' च्या ऐवजी 'President Of Bharat' यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आणि पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्रभरात सभा, बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. पुन्हा पक्ष बांधणीसाठी येवला, बीड नंतर आज जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पार पडणार आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर आज दुपारी ही तीन वाजता ही जाहीर सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांची ही पहिली सभा आहे.

दरम्यान शरद पवार जळगावमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आंदोलन, जालन्यात झालेला लाठीचार्ज त्याचबरोबर 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेचं विशेष अधिवेशनामध्ये इंडिया शब्द हटवण्यावर भाष्य केलं आहे.

राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या G20च्या निमंत्रण पत्रिकेवर 'President Of India' च्या ऐवजी 'President Of Bharat' लिहण्यात आलं आहे. यावर पत्रकार परिषदेत शरद पवारांना प्रश्न करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, इंडिया काय किंवा भारत काय मला त्यावर वाद घालायचा नाही, असं पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar
INDIA Alliance: भारतातून 'इंडिया' गायब होणार? विरोधकांना शह देण्यासाठी केंद्र सरकार आणणार नवे विधेयक

त्याचबरोबर 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या संसदेचं विशेष अधिवेशनामध्ये इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याच्या चर्चा सूरू आहेत. अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर घटनेमधून शब्द कायमचा हटवण्यासाठी केंद्र सरकारी तयारी असल्याचीही माहिती आहे.

Sharad Pawar
Mumbai Crime: एअर हॉस्टेस हत्या प्रकरणाला नवे वळण, सफाई कामगाराने 'या' कारणामुळे केली हत्या

यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, 'मला तशी काही माहिती नाही. उद्या मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठक बोलावली आहे. इंडिया बैठकीत सहभागी झालेले पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची उद्या बैठक आहे. या बैठकीत या गोष्टींचा विचार होईल. पण, हे नाव हटवण्याचा आधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही, देशाशी निगडीत असलेले नावांबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षांना का असते हे मला समजतं नाही, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

Sharad Pawar
Maratha Reservation: जरांगेशी खोतकरांची पुन्हा चर्चा पण तोडगा नाहीच.. सरकारचे शिष्टमंडळ येणार भेटीला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.