Pik Vima Yojana: कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकऱ्यांची लूट; विमा कंपनी प्रतिनिधीनी पंचनाम्यासाठी घेताहेत प्रती पीक दोनशे रुपये

Crop insurance: ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला व ज्यांनी ७२ तासांत विमा कंपनीकडे तक्रारी केल्या, अशाच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे.
Dhananjay Munde  Pik Vima Yojana
Dhananjay Munde Pik Vima YojanaEsakal
Updated on

आष्टी: निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. अशा परिस्थितीत विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बाजार मांडला असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी प्रतीपीक दोनशे रुपयांचा भावच ठरविला आहे. यातून शेतकऱ्यांची प्रचंड लूट सुरू आहे.

दरम्यान हा सर्व प्रकार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीड जिल्ह्यात असले प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला व ज्यांनी ७२ तासांत विमा कंपनीकडे तक्रारी केल्या, अशाच शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी विमा कंपनीमार्फत नेमण्यात आलेले प्रतिनिधी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करत आहेत.

मात्र, नुकसानीचा आर्थिक गैरफायदा उचलत विमा कंपनीचे हे प्रतिनिधी प्रती पीक व प्रती गट क्रमांक दोनशे रुपयांपर्यंत रक्कम उकळत आहेत.

एका शेतकऱ्याने चार ते पाच पिके लावली आहेत. तसेच एका शेतकऱ्याच्या कुटुंबियांचे अनेक खाते आहेत. अशा शेतकऱ्यांनी हजारो रुपये मोजले तरच विमा कंपनीचे प्रतिनिधी पंचनामे करतात.

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडत असलेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. याबाबत तातडीने कारवाई न झाल्यास तहसीलसमोर सोमवारी (ता. ३०) शेतकऱ्यांसह आंदोलन करणार आहे. -
संतोष उर्फ पप्पू गुंड, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना

सर्व पंचनामे हे एकाच ठिकाणी बसून करण्यात येत असून अँभोरा, वाघळूज, चिंचाळा, बेलगाव यासह तालुक्यातील सर्वच गावांत असा प्रकार सुरू आहे. शेतकरी वर्गाला देशोधडीला लावत त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी, अधिकारी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यासह सर्व संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष ऊर्फ पप्पू गुंड यांनी केली आहे.

Dhananjay Munde  Pik Vima Yojana
Beed Crime News: १५९ कोटी रुपयांची फसवणूक अन् मथुरेत संताचा वेश, बीडचा बबन शिंदे कसा अडकला पोलिसांच्या जाळ्यात?

पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

अंभोरा येथील पोलीस ठाण्यासमोर बसून विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याच्या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण काहींनी केले. याचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपनीचे प्रतिनिधी जीव देण्याची धमकी देत आहेत. कंपनीचे प्रतिनिधी काही ही रक्कम फोन पे, गुगल पेवर देखील स्वीकारत आहेत. ही परिस्थिती संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये सुरू आहे.

Dhananjay Munde  Pik Vima Yojana
NCP MLA disqualification: आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी; शरद पवारांची 'ही' मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.