International Anti-Corruption Day 2022: भ्रष्टाचार हा प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असणारा विषय आहे. अनेक कठोर कायदे असतानाही भ्रष्टाचाराला आळा घालण्यास कोणालाही शक्य झालेले नाही. या भ्रष्टाचारामुळेच अनेक देशांची अर्थव्यवस्था देखील पोखरली गेलीये. संयुक्त राष्ट्राकडून देखील याविरोधात पावले उचलली जात आहेत. जागतिक समस्या असलेल्या भ्रष्टाचाराबाबत लोकांना जागृक करणे व याविरोधात लढा देण्यासाठी दरवर्षी ९ डिसेंबरला जागतिक भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti-Corruption Day 2022) साजरा केला जातो.
भारतात देखील अनेक मोठमोठी भ्रष्टाचारी प्रकरण समोर आली आहेत. मात्र, देशातील सर्वात भ्रष्ट राज्य कोणतं आहे माहितीये का? International Anti-Corruption Day 2022 निमित्ताने याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा- Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
मोठमोठ्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
देशातील अनेक मोठमोठ्या नेत्यांवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. यातील काही आरोप सिद्ध झाले, तर काही प्रकरणांमध्ये निर्दोष सुटका झाली. महाराष्ट्राबद्दल सांगायचे तर सिमेंट घोटाळा प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्यावर आरोप झाले होते. यानंतर काँग्रेस नेते सुरेश कलमाडीपासून ते अशोक चव्हाण यांच्यावर देखील वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. याव्यतिरिक्त चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव, २जी घोटाळ्यात माजी मंत्री ए. राजा, सत्यम घोटाळ्यात बी रामलिंगा राजू यांच्यावर आरोप झाले आहेत. अशी अनेक कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत.
भ्रष्टाचारात भारत कितव्या स्थानी?
ट्रान्परन्सी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे दरवर्षी भ्रष्ट देशांची यादी जाहीर केली जाते. २०२१ मध्ये करप्शन परसेप्शन इंडेक्स या अहवालात भारत १८० देशांच्या यादीत ८५ व्या क्रमांकावर आहे. याआधी वर्ष २०२० मध्ये भारताचा क्रमांक ८६वा होता. तर याच संस्थेने २०१९ मध्ये जाहीर केलेल्या अहवालात १८० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ८०वा होता.
भ्रष्टाचारात महाराष्ट्र कितव्या स्थानी?
देशाचा विचार केल्यास इतर राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात समोर आली आहेत. भारतात NCRB कडून भ्रष्टाचार व गुन्ह्यांसंबंधी आकडेवारी जाहीर केली जाते. २०१८, २०१९ आणि २०२० या तीन वर्षाचा विचार केल्यास भ्रष्टाचारासंबंधी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. NCRB ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात २०१८ मध्ये ९३६, २०१९ मध्ये ८९१ आणि २०२० मध्ये ६६४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.