तूम्हाला अजय देवगनचा रेड चित्रपट आठवतोय का?, त्यामध्ये हिरोला माहिती मिळताच तो आपली भलीमोठी टीम घेऊन एका मंत्र्याच्या घरी छापा टाकायला जातो. तिथे सुरूवातीला तर काही मिळत नाही पण नंतर जमीन, स्लॅब, पायऱ्या, खांब कशाकशातून तो पैसे शोधून काढतो आणि टार्गेट पूर्ण करतो. हे तर केवळ चित्रपटात होऊ शकते. मात्र, महाराष्ट्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही यावर्षी असेच प्लॅनिंग करत भले मोठे घबाड शोधून काढले होते.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील सर्वांत मोठ्या बांधकामासाठी स्टीलचं उत्पादन करणाऱ्या चार कंपनीवर हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या नाशिकच्या टीमने ही कारवाई 3 ऑगस्ट 2022 ला सुरू केली होती. या कारवाईसाठी 250 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. तर तब्बल 120 गाड्यातून अधिकारी जालन्यात दाखल झाले होते.
या छाप्यासाठी आयकर विभाग मोक्याची वाट पाहत होते. योग्य संधी मिळताच 260 लोकांची टीम सोबत नेण्याचा निर्णय झाला. पण, अचानक एवढ्या गाड्या रस्त्यावर उतरल्यावर शंका येईल त्यामूळे एक योजना आखण्यात आली. या मोहिमेत नाशिक, मुंबई आणि ठाण्यातून आयकर खात्याचे कर्मचारी जिल्ह्यात दाखल झाले होते. जालन्यात प्रवेश करताना आयकर विभागाचे अधिकारी असलेल्या गाड्यांवर कुछ कुछ होता है, या चित्रपटातील राहूल आणि अंजलीचे नाव वधू आणि वर म्हणून लिहण्यात आले होते. तसेच, गाडीच्या मागे 'दुल्हन हम ले जाएंगे' असे स्टीकर्स लावण्यात आले होते. त्यामुळे या गाड्यांमधून आयकर विभागाचे कर्मचारी इतक्या मोठ्या संख्येने जालना जिल्ह्यात दाखल झाल्याची गंधवार्ताही कोणाला लागली नाही.
आयकर खात्याने कोणालाही सुगावा लागू न देता गुप्तपणे ही मोहीम राबवली. यामध्ये मुख्यत्वेकरून जालन्यातील स्टील व्यावसायिक, भंगार व्यावसायिक आणि काही बँकांचाही समावेश आहे. जालन्यातील एसआरे स्टील कंपनी, कालिका स्टील कंपनीवर छापे टाकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विमलराज सिंघवी आणि प्रदी बोरा हे व्यावसायिक कारवाईच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले जाते.
किती पैसे सापडले
या छापासत्रात आयकर खात्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती मिळाली आहे. यामध्ये ५८ कोटी रुपयांची रोकड, ३२ किलो सोने, हिरे आणि इतर ऐवजाचा समावेश असल्याचे समजते. या मोहीमेबाबत आयकर खात्याकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. १ ते ८ ऑगस्ट या कालावधीत जालना जिल्ह्यात रात्रंदिवस हे छापासत्र सुरु होते.
कुठे लपवली होती एवढी रोकड
आयकर खात्याच्या पाच प्रमुख पथकांचा या मोहीमेत सहभाग होता. या पथकांनी संबंधित स्टील व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले. तेव्हा त्यांच्या हाताला फार काही लागले नाही. त्यानंतर त्या व्यावसायिकांच्या फार्म हाऊसमध्ये शोधाशोध करण्यात आली. तेव्हा त्यांना अधिकाऱ्यांना कपाटांखाली, बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकड लपवून ठेवल्याचे आढळून आले.
तब्बल १४ तास मोजत होते पैसे
जमा झालेले पैसे नजीकच्या एसबीआय बँकेत नेऊन मोजत होते. त्यामुळे बँकेच्या टेबलांवर ठिकठिकाणी नोटांच्या बंडलांची थप्पी रचलेली दिसत होती. इतके कर्मचारी आणि १२ मशिन्स दिमतीला असूनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तास लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.