Sharad Pawar Latest News : शरद पवारांबाबत आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेनं घेतला मोठा निर्णय; शिंदे-फडणवीस सरकारलाही धरलं धारेवर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आम्हाला मदत केली. त्यामुळे नैतिकदृष्ट्या परिषदेने या ‘राष्ट्रवादी’च्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Ajit Pawar Vs Sharad Pawar
Ajit Pawar Vs Sharad Pawaresakal
Updated on
Summary

'येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आमच्या समाजाचे काम करील. त्याच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने समाजाला हक्काचा मतदार म्हणून त्या पक्षाने गृहीत धरू नये.'

Kolhapur News : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ब्राह्मण समाजाला मदत केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेचे (International Brahman Council) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहेत, असं स्पष्ट मत मकरंद कुलकर्णी आणि ॲड. विजय जमदग्नी यांनी व्यक्त केलं.

याबाबतचे पत्र त्यांना पाठविले असल्याचेही परिषदेचे कार्यकारिणी प्रमुख मकरंद कुलकर्णी आणि अध्यक्ष ॲड. विजय जमदग्नी यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. जो राजकीय पक्ष आमच्या समाजाचे काम करेल त्याच्या पाठीशी राहण्याचे धोरण स्वीकारले आणि कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

Ajit Pawar Vs Sharad Pawar
NCP Crisis : 'या' वादळापुढं तीन चाकी सरकार कोलमडल्याशिवाय राहणार नाही; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाकीत

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आम्हाला मदत केली. त्यामुळे नैतिकदृष्ट्या परिषदेने या ‘राष्ट्रवादी’च्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो पक्ष आमच्या समाजाचे काम करील. त्याच्याबरोबर असणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने समाजाला हक्काचा मतदार म्हणून त्या पक्षाने गृहीत धरू नये.

Ajit Pawar Vs Sharad Pawar
Sanjay Mandlik : देशभरातील 270 खासदारांत मंडलिकांनी पटकावला पाचवा क्रमांक; NCP चा 'हा' बडा नेता कितव्या क्रमांकावर?

महाविकास आघाडीने ब्राह्मण समाजाची (Brahmin Community) अमृत संस्था स्थापन केली. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या संस्थेचे काम ‘जैसे-थे’ स्थितीत आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. प्रदीप अष्टेकर, स्वानंद गोसावी, अजित देशपांडे, केदार कानिटकर, कमलाकर देशपांडे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar Vs Sharad Pawar
पूजेसाठी वापरला जाणारा 'कापूर' कशापासून तयार केला जातो? काय आहेत फायदे, झाड का होतंय दुर्मिळ; जाणून घ्या..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()