सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क स्टेडिअम! तरी IPL, MPLच्या क्रिकेट सामन्यांची हुकली संधी; ‘ही’ आहेत दोन प्रमुख कारणे

सोलापुरात इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर जानेवारीत रणजी सामने पार पडल्यानंतर आयपीएल किंवा एमपीएलचे क्रिकेट सामने होतील, अशी सोलापूरकरांना आशा होती. मात्र, अपुरी प्रेक्षक क्षमता आणि डे-नाईट सामन्यासाठी लागणारी फ्लड लाइट नसल्याने सोलापुरात ते सामने अशक्य असल्याचे सांगण्यात आले.
solapur
Park Stadium esakal
Updated on

सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर जानेवारीत दोन रणजी सामने पार पडल्यानंतर आयपीएल किंवा एमपीएलचे क्रिकेट सामने होतील, अशी सोलापूरकरांना आशा होती. मात्र, जिल्हा क्रिकेट असोसिएशनने त्यासाठी प्रयत्न करूनही अपुरी प्रेक्षक क्षमता आणि डे-नाईट सामन्यासाठी लागणारी फ्लड लाइट नसल्याने सोलापुरात ते सामने अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्या सुविधांसाठी आता असोसिएशनचा पाठपुरावा सुरू झाला आहे.

सोलापूर शहर-जिल्ह्यात क्रिकेटकडे अनेकांचा कल वाढू लागला आहे. स्मार्ट सिटीतून जवळपास १६ कोटी रुपयांचा खर्च करून सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात आले आहे. त्यानंतर याच मैदानावर तब्बल २९ वर्षानंतर महाराष्ट्रविरूद्ध मणिपूर आणि महाराष्ट्रविरूद्ध सौराष्ट्र असे दोन सामने रणजी सामने पार पडले.

आगामी काळात सोलापूरची विमानसेवा सुरू होईल, पंचतारांकित हॉटेल देखील याठिकाणी आहे. त्यामुळे मैदानावर स्क्रीन लावून दरवर्षी आयपीएल किंवा २०-२०चे क्रिकेट सामने पाहाणाऱ्या सोलापूरकरांना आता प्रत्यक्षात आपल्या इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर २०-२०चे किंवा आयपीएल, एमपीएलचे (महाराष्ट्र प्रिमिअर लिग) सामने प्रत्यक्षात पाहता येतील, अशी आशा वाटू लागली आहे. मात्र, त्यासाठी मैदानाची प्रेक्षक क्षमता वाढविण्याची आणि फ्लड लाईटची सोय येथे होणे जरुरी असून त्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे.

फ्लड लाईट अन्‌ मैदानाची प्रेक्षक क्षमता वाढीसाठी प्रयत्न

आयपीएल व एमपीएलचे क्रिकेट सामने सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर निश्चितपणे होतील. पण, मैदानाची प्रेक्षक क्षमता कमी ३५ ते ४० हजारांपर्यंत झाल्यास आणि डे-नाईट क्रिकेट सामन्यांसाठी फ्लड लाईटची सोय झाल्यास आगामी काळात आयपीएल, एमपीएलसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने याठिकाणी होतील. त्या सुविधा मैदानावर उपलब्ध होण्यासाठी असोसिएशनतर्फे प्रयत्न सुरू आहेत.

- चंद्रकांत रेंम्बर्सू, सचिव, जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सोलापूर

आजपासून महिलांचे आंतरजिल्हा क्रिकेट सामने

सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवर उद्यापासून (सोमवारी) आंतरजिल्हा महिलांचे क्रिकेट सामने सुरू होत आहेत. सकाळी साडेनऊ वाजता पहिला सामना सुरू होईल. प्रत्येक सामना ५० षटकांचा असणार आहे. या क्रिकेट सामन्यासाठी सिंधुदुर्ग, सांगली, डार्क पुणे व युनाटेड पुणे हे चार संघ आहेत. ३, ४ व ६ जूनपर्यंत सामने चालणार आहेत. सामने यशस्वी होण्यासाठी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व टुर्नामेंट कमिटी परिश्रम घेत आहे. खेळाडूंच्या राहण्याची सोय स्टेडिअमवरच करण्यात आली आहे. या सामन्यातील यशस्वी खेळाडूंची पुढे विभाग व राज्याच्या संघात निवड होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.