Internet Ban in Jalna: संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट बंद! जरांगेंची पत्रकार परिषद सुरु असतानाच आले मेसेज

मराठा आरक्षण आंदोलनानं हिंसक रुप घेतलं आहे. राज्यातील विविध ठिकाणी जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil sakal
Updated on

जालना : मराठा आरक्षण आंदोलनानं हिंसक रुप घेतल्यानं संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काही वेळापूर्वी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, साम टिव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Internet Ban in entire Jalna district message came while Manoj Jarange press conference)

Manoj Jarange Patil
Eknath Shinde: "मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे"; CM शिंदेंचा हल्लाबोल

जालन्यात ठिकठिकाणी आंदोलनं

कालपासून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. जागोजागी टायर जाळून रस्ते अडवले जात आहेत. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यानंतर परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एअरटेल कंपनीनं आपली इंटरनेटची सेवा बंद केली. (Latest Marathi News)

इंटरनेट सेवा बंद झाल्याचा मेसेज नागरिकांना आपल्या मोबाईलवर आल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणं जिओ आणि इतर मोबाईल कंपन्यांकडूनही इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Marathi Tajya Batmya)

Manoj Jarange Patil
Maratha Reservation: नव्यानं गोळा करणार इम्पिरिकल डेटा; मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

दोन दिवस इंटरनेट बंद राहणार

बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जालना जिल्ह्यात दोन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून काही अनुचित प्रकार घडण्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाल्याचं बोललं जात आहे. एबीपी माझानं याबाबत माहिती दिली आहे.

Manoj Jarange Patil
Apple Alert: आयफोन हँकिंगच्या विरोधकांच्या आरोपांना भाजपचं प्रत्युत्तर; चुकीचं काही पाहता...

जरांगेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन

जालन्यातील इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. तसेच इंटरनेट बंद न करण्याची विनंती केली. कारण जर असं झालं तर लोकांचा गैरसमज होईल, असं त्यांनी फोनवरुन बोलल्याचं टीव्हीच्या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.