Invest MP : राज्यातील गुंतवणूक आता MPमध्ये? शिवराजसिंह चौहान पुण्यात का?

मध्यप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नवा डाव खेळला जातोय का? अशी शंका निर्माण झालीय.
Invest MP
Invest MPSakal
Updated on

पुणे : पुण्यात शुक्रवारी (ता. २१) इन्व्हेस्ट एमपी (Invest MP) या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान पुण्यात येणार आहेत. मध्यप्रदेशचे उद्योग मंत्री, आयएएस अधिकारी आणि मुख्यमंत्री असे सर्वजण या परिषदेला उपस्थित असणार आहेत. तर आता पुन्हा महाराष्ट्रातील उद्योगाला, गुंतवणुकीला मध्यप्रदेशची दिशा मिळणार का अशी शंका निर्माण झाली आहे.

(Invest MP Council Pune Latest Updates)

दरम्यान, मध्यप्रदेशमधील गुंतवणूक वाढावी यासाठी मध्यप्रदेश सरकारकडून दरवर्षी या परिषदेचं मध्यप्रदेशमध्ये आयोजन केलं जातं. पण यावर्षी हे आयोजन पुण्यात करण्यात आल्यामुळे अनेकांच्या नजरा विस्फारल्या आहेत. तर ही परिषद झाल्यानंतर शिवराजसिंह चौहान महाराष्ट्रातील उद्योगपतींशी वैयक्तिकरित्या चर्चाही करणार आहेत. त्यामध्ये संजय किर्लोसकर, बाबा कल्याणी, आश्विनी मलहोत्रा यांच्यासोबतच इतर उद्योजकांचे नावं आहेत.

Invest MP
Karnataka: मागच्या व्यक्तीने सीटबेल्ट न लावल्यास 1000 रूपये दंड; निर्णयाची अंमलबजावणी

ही परिषद महाराष्ट्रातील पुण्यातंच का?

पुणे हे औद्योगिकदृष्ट्या विकसनशील शहर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर औद्योगिक विकासाला गती मिळाली. तर पुण्यात किर्लोस्कर, फोक्सवॅगन, टाटा, महिंद्रा, बजाज या ऑटो उद्योगांबरोबरच आयटी क्षेत्रातलेसुद्धा नावाजलेले उद्योग आहेत. आयटीमधील इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा यांसारख्या नावाजलेल्या विविध कंपन्या पुण्यात आहेत. त्याचबरोबर पुण्यात शिक्षण संस्था, पाणी, वीज, रस्ते आणि सुशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे पुणे शहर नेहमीच इतर उद्योजकांना गुंतवणुकीसाठी खुणावत असते. त्याच दृष्टीकोनातून पुण्यातील उद्योजकांना मध्यप्रदेशकडे आकर्षित करण्यासाठी ही परिषद आयोजित केली असल्याचा अंदाज आहे.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला

काही दिवसांपुर्वीच वेदांता फोक्सकॉन पुणे जिल्ह्यातून प्रकल्प गुजरातला गेला. दीड लाख कोटी गुंतवणूक आणि जवळपास एक लाख रोजगारनिर्मिती होणार असलेला प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीमुळे भाजपचा हा डाव असल्याचा आरोप अनेकांनी केलाय. तर राज्यातील सध्याच्या भाजप सरकारने महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवला आहे. मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं सध्याच्या राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे.

Invest MP
Shivraj Patil Chakurkar: वाद पेटणार! गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला; शिवराज पाटलांचे विधान

महाराष्ट्राची गुंतवणूक मध्यप्रदेशमध्ये होणार?

दरवर्षी मध्यप्रदेशमध्ये होणारी इन्व्हेस्ट एमपी परिषद पुण्यात होण्यामागे कारण काय? हा प्रश्न उपस्थित झाला असून पुण्यातील आणि महाराष्ट्रातील नामांकित उद्योजकांना मध्यप्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचे हे आकर्षण असावे का अशीही शंका उपस्थित केली जात आहे. तर भविष्यातील महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक आणि प्रकल्प परत महाराष्ट्राबाहेर जाणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची तयारी?

दरम्यान, २०२३ मध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. सध्या मध्यप्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. येणाऱ्या निवडणुकांतही सत्ता कायम राखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारकडून मध्यप्रदेशमध्ये गुंतवणूक करून हा डाव टाकला जातोय का? असा प्रश्न आहे.

तर गुजरातमध्येही पुढच्या वर्षी निवडणुका होणार असून त्यासाठी वेदांता प्रकल्प गुजरातला हलवला आणि त्यामागे केंद्रातील भाजप सरकारचा हात होता असे आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून महाराष्ट्रातील गुंतवणूक मध्यप्रदेशमध्ये नेली जाणार का याकडे काटेकोरपणे लक्ष असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.