Irshalwadi Landslide: राजकारण्यांनी घटनास्थळी का जाऊ नये, आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण

Aditya Thackrey on Irshalwadi Landslide: राजनीति करणार नाही, आत्ता मदतकार्य महत्वाचं, अशी भूमिकाही आदित्य ठाकरेंनी मांडली.
Aditya Thackrey in Irshalwadi
Aditya Thackrey in IrshalwadiEsakal
Updated on

Aditya Thackrey at Irshalwadi: रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली. यामध्ये पूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. या घडलेल्या घटनेवर प्रत्येकाकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभेच्या सभागृहातही आमदारांकडून आमदारांकडून दु:ख व्यक्त करण्यात आलं. बाळासाहेब थोरात यांनी या परिस्थतीत राजकारण न करता आम्ही सरकारसोबत आहोत अशी भावना व्यक्त केली होती. अशातच आदित्य ठाकरेंनीही आपले मत मांडले आहे.

आदित्य ठाकरे दुपारी १२च्या सुमारास इर्शाळवाडी येथे जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत सुनिल प्रभू हे देखील होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, "अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपल्यापरिने जे करु शकतो ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सरकारी यंत्रणा या ठिकाणी कामी लागलेली आहे. NDRFचे देखील बचावकार्य सुरु आहे. आपण तिकडे जाणं योग्य नाही. अडचणीचा तो भाग आहे. आपल्यामुळे NDRFच्या जवानांना अडथळा होऊ नये, म्हणून आम्ही सर्व इथे थांबलो आहोत. लोकांनी आणि राजकारणी लोकांनी त्याठिकाणी जाण टाळलं पाहिजे."

Aditya Thackrey in Irshalwadi
Khalapur Irshalwadi Landslide : मित्रांसोबत शाळेत झोपलो होतो अन् मोठ्ठा आवाज झाला...; दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणांनी सांगितला थरारक अनुभव

त्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आदित्य ठाकरे या परिस्थितीत राजकारण करणार नाही, असे मत व्यक्त केले. सध्या लोकांना धीर देण्याची गरज आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की,"मला ह्यात राजकारण करायचे नाही, हा नैसर्गिक प्रश्न आहे."

यापुढे आदित्य ठाकरे म्हणाले की,"ही घटना एवढी भीषण आहे की, भौगोलिक परिस्थितीमुळे, पावसामुळे अजूनही बचाव कार्यात अडथळा येत आहे. अशावेळी सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहेतच. त्यांना यश येऊन इथले गावकरी सुखरूप ह्या संकटातून बाहेर येवोत, ही ईश्वर चरणी प्रार्थना."

Aditya Thackrey in Irshalwadi
Irshalwadi Landslide : महाराष्ट्रासाठी जुलै महिना ठरतोय काळरात्र! आधी माळीण, तळीये अन् आता इर्शाळवाडी डोंगराखाली

इर्शाळवाडीच्या या नैसर्गिक आपत्तीनंतर विरोधकांकडून सरकारसोबत असल्याची भावना व्यक्त केली आहे. या कठीण वेळेत राजकारण न करता लोकांना वाचवणं जास्त गरजेचं आहे, असे मत विधानसभेत नेत्यांनी व्यक्त केले.

इर्शाळवाडी येथे अजूनही बचावकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि इतर बचावपथकं देखील काम करत आहे. अनेक लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलंय आणि त्यांची प्रकृतीही स्थिर आहे.

Aditya Thackrey in Irshalwadi
Irshalwadi Landslide : महाराष्ट्रासाठी जुलै महिना ठरतोय काळरात्र! आधी माळीण, तळीये अन् आता इर्शाळवाडी डोंगराखाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.