Irshalwadi Landslide update:गुरुवारी (दि.२० जुलै) सकाळी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना सर्वांना समजली. रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली ४० ते ५० घरांची वस्ती म्हणजे इर्शाळवाडी. बुधवारी रात्रीच्या सुमारास या छोट्याश्या गावावर संकट कोसळंल.
धो-धो पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या गावार दरड कोसळली. घटना समजताच बचावपथक घटनास्थळी पोहोचलं. मात्र, रात्रीच्या वेळी असणाऱ्या काळ्या-कुट्ट अंधारामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता.
घटना प्रकाशात आल्यापासून आतापर्यंत काय-काय घडलं?
रात्री १० नंतर सारं गावं झोपी गेलं, तेव्हा गावातील मासेमारी करणारी लोकं आपली दैनंदिन काम संपवून घरी जाण्याच्या मार्गावर होती
या लोकांनी पाहिलं की डोंगराचा काही भाग खचतोय आणि काही वेळाने ४०-५० घरांची वस्ती असणारं गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं
या लोकांनी माहिती दिल्यानंतर ११.३०च्या सुमारास सरपंच आणि काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.
या ग्रामस्थांनी १२-१२.१५ च्या सुमारास स्थानिक पोलिस आणि तहसिलदारांना या घटनेबाबात माहिती दिली.
१२.३० ते १२.४५च्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन आले
१ ते १.३० स्थानिक आमदारांना याबद्दस माहिती मिळताचं तेही त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोहोचले
रात्री २ वाजता गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी केली
रात्री २.३० वाजता मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे घटनास्थळी आले आणि त्यांनीही परिस्थितीचे निरीक्षण केले
२.४५ ते ३च्या दरम्यान NDRFच बचावपथक घटनास्थळी दाखल झालं
४ वाजेच्या सुमारास प्रशासनाचे काही कर्मचारी गावकऱ्यांना साथीला घेऊन अडकलेल्या लोकांना बाहेर काढत होते.
४.३० नंतर बचाव कार्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे बचावपथक देखील घटनास्थळी दाखल झाले.
सकाळी ५ वाजता बचावपथक वर जात असताना बचावपथकातील एका जवानाचा मृत्यू झाला
५.३० पर्यंत २५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं होतं तर यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला होता.
६ वाजेच्या सुमारास इतर यंत्रणा बचाव कार्यासाठी पुन्हा वर गेल्या
७.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.
सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करण्यात यावं यासाठी मागणी केली
८.४५ वाजता मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील इर्शाळवाडी येथे पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली
९.२० वाजेपर्यंत ८० लोकांना यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले. यात ५ जणांचा मृत्यू झाला होता. (Latest Marathi News)
९.४५ अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन अतिवृष्टी आणि पूरस्थितीची माहिती इर्शाळवाडीत असणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.
११च्या सुमारास इर्शाळवाडीच्या घटनास्थळी शिवभोजन थाळीचे मोफत पॅकेट वाटण्याची छगन भुजबळ यांची घोषणा
११.४५ वाजता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे इर्शाळवाडी येथे पोहोचले
१२ वाजेपर्यंत इर्शाळवाडीमधील दुर्घटनेत १० लोकांचा मृत्यू झाला होता.
१२.४५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली.
दुपारी १.१५ च्या सुमारास L&Tच एक मोठ बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं
१.४० वाजता गिरीश महाजनांनी बचावकार्य अवघड असल्याचे सांगितले.दुर्घटनेच्या ठिकाणी गर्दी न करण्याचे राज्य सरकारचे आवाहन. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.