Irshalwadi Landslide: इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊ शकते! रायगड जिल्ह्याला हायअलर्ट

सरकारनं विधानपरिषदेत सांगितली दरडप्रवण गावांची संख्या
Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi LandslideEsakal
Updated on

मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या दरड दुर्घटनेत संपूर्ण गावचं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं होतं. यामध्ये २७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

पण अशाच दरड कोसळण्याच्या अनेक घटना या भागात घडू शकतात, त्यामुळं रायगड जिल्ह्याला हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य सरकारनं बुधवारी विधानपरिषदेत दिली. (Irshalwadi Landslide like incident may repeat itself High alert for Raigad district)

Khalapur Irshalwadi Landslide
Nitin Desai Death: नितीन देसाईंच्या आत्महत्येमागं कारण काय? स्थानिक आमदारानं व्यक्त केला संशय

आमदार प्रसाद लाड यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागानं तारांकित प्रश्नोत्तरात याबाबत लेखी माहिती दिली. सरकारनं म्हटलं की, इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊ शकते अशी अनेक ठिकाणी रायगड जिल्ह्यात आहेत. यामध्ये एकूण २११ गावं अशी आहेत तिथं दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्याला हायअलर्टवर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Khalapur Irshalwadi Landslide
Haryana Violence: हिंसाचारामागं बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं हेटस्पीच! कोण आहे मोनू मानेसर?

दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. यावेळी ज्या गावावर हा डोंगर कोसळला त्या गावातील काही तरुण मुलं गावातील शाळेच्या परिसरात गप्पा मारत बसली होती. त्यांनीच पहिल्यांदा या दुर्घटनेची माहिती दिली. ते दूर असल्यानं यातून वाचू शकले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला तर ७८ लोक बेपत्ता झाले. १२४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.