Irshalwadi Landslide : अंगावर काटा आणणारी दुर्घटना! डोंगराखाली बेचिराख इर्शाळवाडी; इथं आजही गुदमरतो दुर्गंधीनं श्‍वास

इर्शाळवाडीची अवस्‍था आहे, ती पाहून बचावलेले नातेवाईक हताश होत आहेत.
Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslideesakal
Updated on
Summary

इथं पसरलेला मातीचा ढिगारा आणि त्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीने श्‍वास गुदमरून जाईल, अशी भयाण स्थिती सध्या इर्शाळवाडीत आहे.

अलिबाग : डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या लोकांचे जीवन किती कष्टमय असते, हे इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर (Irshalwadi Landslide) समोर आले आहे. डोंगराखाली बेचिराख झालेल्या इर्शाळवाडीत आता भयाण शांतता पसरली आहे.

Irshalwadi Landslide
वाद चिघळला! 'कावेरी'वरून कर्नाटकला मोठा धक्का; तामिळनाडूला रोज पाच हजार क्युसेक पाणी सोडण्याची सूचना

मातीच्या ढिगाऱ्यातून दिसणाऱ्या घराची उडालेली छपरे, त्याखाली दबलेली भांडीकुंडी, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला मातीचा ढिगारा आणि त्या ढिगाऱ्यातून येणाऱ्या दुर्गंधीने श्‍वास गुदमरून जाईल, अशी भयाण स्थिती सध्या इर्शाळवाडीत आहे.

मातीचा ढिगारा आजही इतका भुसभुसीत आहे की त्यावरून चालताना पाय मातीत रुततात. ढिगाऱ्याखाली बेपत्ता झालेले ५७ नागरिक आणि त्यांच्या गुराढोरांचे काय झाले, असा विचार मनात आला की अंगावर काटा येतो. दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी असेल, त्‍या स्‍थितीत वाडी सोडली.

Irshalwadi Landslide
Gokul Dudh Sangh : उच्च न्यायालयाच्या 'या' निकालानंतर शौमिका महाडिक आक्रमक; गावोगावी जाऊन सांगणार 'ही' माहिती

चाळीस दिवसांत इर्शाळवाडीच्या बातम्या सतत प्रसारमाध्यमांवर झळकत होत्या; मात्र प्रत्यक्ष इर्शाळवाडीची आज जी अवस्‍था आहे, ती पाहून बचावलेले नातेवाईक हताश होत आहेत. सरकारने आम्‍हाला सर्वकाही दिले, अगदी कपडे शिवण्याच्या सुईपासून सर्व सुखसोयी दिल्या; पण आम्ही आमची वाडी आणि नातेवाईक पुन्हा पाहू शकणार नसल्याची खंत असल्‍याचे पदी वाघ या महिलेने भावनिक होत सांगितले.

Irshalwadi Landslide
Bedag : बाबासाहेबांच्या नावाची कमान पाडणाऱ्या गावात मोठा ठराव; विरोधात निकाल जाताच ग्रामसभेतून आंबेडकरी समाज पडला बाहेर

वाडीवर राहिलेले साहित्य आणण्यासाठी गेलेल्या लोकांची पदी वाघ पायथ्याशी वाट पाहत होती. मोडलेला संसार आणि आपल्या नातलगांच्या आठवणीमुळे वयस्कर मंडळी वाडीवर जाण्याचे टाळतात. तरुणच वाडीवर जाऊन राहिलेले साहित्य शोधण्याचा प्रयत्न करतात; परंतु त्यांचीही हिंमत फारशी होत नाही. दुर्घटनेच्या दोन दिवसांनंतरच जिल्हा प्रशासनाने वाडीवर जाण्यास १४४ कलमाद्वारे सक्त मनाई केली होती.

बचावकार्य राबवणारे पथक वाडीवर काही दिवस मुक्कामी होते. त्यानंतर वाडीकडे जाणारी वाट लोखंडी पत्रे लावून बंद करण्यात आली. महिनाभर तेथे जाण्याची फारशी कोणी हिंमतही केली नाहीत. आता राहिलेली भांडीकुंडी, गॅस सिलिंडर अशा वस्तू घेण्यासाठी ग्रामस्‍थ जात आहेत. मात्र, त्यांच्यातही एकट्याने जाण्याचे मनोबल राहिलेले नाही.

Irshalwadi Landslide
Wedding Ceremony : लग्नातलं जेवण पडलं महागात; तब्बल 200 हून अधिक जणांना विषबाधा; मिरजेतील पाहुण्यांचाही समावेश

गुरे-ढोरे गडावरच

इर्शाळवाडी दुर्घटनेतील काही जनावरे वाचली आहेत. ती तीस-चाळीस जनावरे माळरानावर चरतात. सायंकाळ झाल्यावर हंबरडा करणाऱ्या वासराला दूध पाजण्यासाठी येणाऱ्या गायीही कासावीस होतात. गोठ्यात आल्यावर मायेने अंगावरून हात फिरणाऱ्या मालकांना त्‍याची नजर शोधत असते.

वाडीवर जाणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे ही जनावरे मोठ्या कुतूहलाने पाहतात. गायी-ढोरे पाळणे हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. तेथे घरांबरोबर गोठेही बेचिराख झाल्याने गुरांचा आधार हरपला आहे.

वाडीवर जाण्यास परवानगी नाही. एनडीआरएफचे पथक गेल्यानंतर सरकारी अधिकारीही फारसे फिरकले नाहीत. येथे कोणी येऊ नये म्हणून लोखंडी पत्रे लावून वाट बंद केली आहे. ऊन पडल्‍याने वाडीची परिस्थिती पाहण्यासाठी आलो, आता जाताना चांगल्या स्थितीतील वस्तू नेणार आहे.

- गौतम वाघ, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.