Irshalwadi Landslide : दुर्घटनाग्रस्त गावाचं कायमस्वरुपी पुनर्वसन करणार; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslide esakal
Updated on

Irshalwadi Landslide update:महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगडच्या खालापुर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेली ४० ते ५० घरांच्या वस्तीवर दरड कोसळलली. बुधवारी रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

धो-धो पडणाऱ्या पावसामुळे या गावार दरड कोसळली. घटना समजताच बचावपथक घटनास्थळी पोहोचलं. मात्र, रात्रीच्या वेळी असणाऱ्या काळ्या-कुट्ट अंधारामुळे आणि पावसामुळे बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता.

Irshalwadi Landslide
Velhe Landslide : एसटी 'त्या' खिंडीतून जाण्यापूर्वीच दरड कोसळली अन् अनर्थ टळला !

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे तळ ठोकून असून काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलतांना गावचं पुनर्वसन करण्याचा शब्द दिला. या घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झालेला असून ९३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. तर १०० हून अधिक जण बेपत्ता आहेत.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना अतिषय भीषण आणि दुर्दैवी आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासन करणार असून सगळे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. पाऊस असतांनाही रेस्क्यू टीमचं काम सुरुच आहे

Irshalwadi Landslide
Prakash Ambedkar : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आंबेडकरांची प्रतिक्रिया; म्हणाले...

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाहीये. सामाजिक संस्था, रेस्क्यू टीमचं काम पावसातही सुरुच आहे. तातडीने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करण्यात आलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोन झाला. केंद्राकडून सहकार्य मिळणार आहे. दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना राहण्यासाठी ६० कंटेनरमध्ये व्यवस्था करण्यात आलीय तर त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं मुख्यमत्र्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.