Irshalwadi Landslide : दरड का कोसळली? 'पाच' धक्कादायक कारणं आली समोर

Irshalwadi Landslide
Irshalwadi Landslideesakal
Updated on

रायगडः रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत १२ जणांचा मत्यू झाला आहे. तर आणखी शंभरापेक्षा जास्त लोकांचा शोध सुरुय. काही वेळापूर्वी मुसळधार पावसामुळे शोध मोहीम थांबवण्यात आलेली आहे.

इर्शाळवाडीमध्ये आतापर्यंत ९३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड तास पायी जात दुर्घटनाग्रस्त भागाची पाहाणी केली आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिवाय दुर्घटनाग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.

Irshalwadi Landslide
IMD : रायगड, पुण्यासह चार जिल्ह्यांना रेड अलर्ट! अतिमुसळधार पावसाचा इशारा

हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या 'सतर्क' या संस्थेने सदरील दुर्घटनेमागे पाच कारणं असल्याचं सांगून एक प्राथमिक विश्लेषण सादर केले आहे. यामध्ये अतिवृष्टी हे मुख्य दर्शवण्यात आलेले आहे.

इर्शाळवाडीमध्ये दरड का कोसळली?

  • १. ज्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळली तिथे घटनास्थळाच्या जवळील खालापूर आणि कर्जत या दोन्ही पर्जन्यमापकावर ७२ तासांमध्ये ६०० मीमी पावसाची नोंद झालीय.

  • २. डोंगर उतारावर असलेल्या या गावच्या वरील बाजूस असलेली झाडांची गर्दी तेथील मातीची खोली दर्शवते.

  • ३. सदरील दरड ही 'मर्ड फ्लो' प्रकारातली असल्याचं दृष्यांमधून लक्षात येत आहे.

  • ४. कमी वेळेत जास्त पाऊस झाला. त्यामुळे मातीची पाणी धारण करण्याची क्षमता संपली आणि झालेला चिखल उतारावरुन घसरुन आला.

  • ५. याशिवाय रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्रासाठी १९ जुलै रोजी सतर्कतर्फे अलर्ट देण्यात आल्याचंही नमदू केलं आहे.

दरम्यान, धो-धो पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या गावार दरड कोसळली. घटना समजताच बचावपथक घटनास्थळी पोहोचलं. मात्र, रात्रीच्या वेळी असणाऱ्या काळ्या-कुट्ट अंधारामुळे आणि धो-धो बरसणाऱ्या बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता. सकाळ होताच नियोजनबद्ध पद्धतीने शोध मोहीम सुरु झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.