Irshalwadi Landslide: रात्रभर 'त्या' ढिगाऱ्यावर चढून हाका देत होतो.. संततधारेमध्ये मदतकार्य करणाऱ्या गिर्यारोहकांचा थरारक अनुभव

Irshalwadi Landslide News in Marathi: या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ९३ जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.
Irshalwadi Landslide News in Marathi
Irshalwadi Landslide News in Marathi
Updated on

Irshalwadi Landslide update : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या ४० ते ५० घरांच्या वस्तीवर दरड कोसळली. बुधवारी रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ९३ जणांना सुखरुप बाहेर काढले आहे.

सर्वात आधी 'यशवंती हायकर्स'चे पद्माकर गायकवाड, महेंद्र भंडारे, अभिजित घरत तसेच गणेश गीध इर्शाळवाडी जवळ पोहचले. त्यांच्या टीमने एकूण चार जखमींना खाली Ambulance पर्यंत आणण्यासाठी मोठी मदत केली.

एक तरुणाचा पाठीचा कणा मोडला होता. त्याला त्यांनी स्ट्रेचरवरुन रुग्णवाहिकेपर्यंत नेले. एका आदिवासी स्त्रीचे डोके फुटले होते तिला सचिन, पराग व बाळा घेऊन खाली नेले.

Irshalwadi Landslide News in Marathi
Brijbhushan Singh : अखेर जामीन मिळालाच! महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात BJP खासदार ब्रिजभूषण सिंह यांना दिलासा

यशवंती हायकर्सच्या वतीने सांगण्यात आले की, एक तरुणाचा एक पाय मोडला होता त्याला रुद्र शिंदे व शुभम शिंदे आणि इतर स्थानिक तरुण यांनी उचलून खाली रुग्णवाहिकेपर्यंत नेले. पद्माकर गायकवाड पायथ्याशी समन्वय ठेवून होते.

वरच्या टप्प्यावर यशवंतीचे अभिजीत घरत संपर्कासाठी थांबले होते. त्यावरच्या टप्प्यावर यशवंतीचे अध्यक्ष महेंद्र भंडारे स्वतः थांबले होते. महेंद्रनेच वरील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. यशवंतीचे बाकीचे शिलेदार वर होतेच. महेंद्रही नंतर वाडीमध्ये पोहोचले.

Irshalwadi Landslide News in Marathi
Sharad Pawar : शरद पवारांना धक्का! नागालँडमधील सात आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा

यशवंती हायकर्सच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही वाडीत पोहचलो तेव्हा पावसाची संततधार चालूच होती शिवाय अंधार व दाट धुकं होतं.

आमच्या विजेऱ्या घेऊन गणेश गीधच्या पुढाकाराने आम्ही सगळे ढासळलेल्या व काही अर्ध्यामूर्ध्या उभ्या असलेल्या काही घरांजवळ जाऊन व प्रसंगी त्या ढिगाऱ्यावर चढून हाका देत होतो व काही प्रतिसाद मिळतोय का पाहत होतो. उजाडेपर्यंत आम्ही हे काम केले. जिवंतपणाचे काही लक्षण दिसले नाही. आश्चर्य म्हणजे काही बकऱ्या, शेरडं व गुरे बचावली आहेत.

वाडीत आम्ही ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका जिवंत बैलाला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पुढील दोन्ही पाय ढिगाऱ्याखाली असल्याने तो उठू शकला नाही. नंतर NDRF च्या जवानांनी त्याला मोकळे केले. उजाडल्यानंतर NDRF चे शिस्तबद्ध काम सुरू झाले. अनेक मदतकर्ते व बाचावपटू पोहचले होते व तसेच असेच खूप जण वर जात होते.

इर्षाळवाडीतून इर्षाळकडे तोंड करून उभे राहिले असता, वाडीच्या मागील डोंगराचा (नेढ्याच्या खालील पण उजवीकडील) उजवीकडील साधारणतः १०० फूट उंच व २०० फूट रुंद मातीचा चढावाचे भूस्खलन झाले. शाळेच्या डावीकडील व उजवीकडील काही घराचे नामोनिशाण राहिले नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.