Ajit Pawar: भाजप करणार शिंदेगटाची कोंडी? CM शिंदेंच्या गटाला अजितदादांची साथ फायद्याची की तोट्याची

विकासासाठी हातमिळविणी केल्याचा दोन्ही नेत्यांचा दावा
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही विकासाला सोबत घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र वर्षापूर्वी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असाच राजकीय भूकंप करताना शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्ष्य करीत अजित पवार यांच्यावरही असमान निधी वाटल्याचा आरोप केला होता. (Latest Marathi News)

शिंदे यांच्यासह बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या मंत्री, आमदारांनीही हा सूर आवळला होतो. मात्र, वर्षभरातच शिंदे यांनी कोलांटउडी घेताना पवार यांना विकासाची साथ म्हणत सत्तेत सामावून घेतले आहे. यावर शिंदे यांना ही ‘विकासाची साथ’ राजकीय फायद्यात ठेवणार की तोट्यात घेऊन जाणार, हे येणार काळच ठरवेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.(Latest Marathi News)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास ४६ आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.(Latest Marathi News)

पवार यांच्यावर टीका करून महाविकास आघाडीमधून शिवसेनेतून ५० आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे बाहेर पडले होते. भाजपसोबत सत्तांतर करून तेमुख्यमंत्री झाले व वर्षातच पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिल्याने शिंदेंसह शिवसेनेच्या मंत्र्यांचीही गोची झाली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी व मंत्र्यांनी पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आली तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, अशी जाहीर वक्तव्ये केली होती. त्यामुळे आपण व इतर सहकाऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेचे काय, असा प्रश्न शिंदे यांना पडला आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Ajit Pawar: 'राज्यभरात बॅनर लावताना शरद पवारांचा फोटो...', उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यकर्त्यांना आदेश

तोटा कसा होऊ शकतो?

लोकसभेला शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार यांची भाजपला अधिक मदत होणार, याची राज्यातील व केंद्रातील नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे पवार यांचे महत्त्व वाढून शिंदे यांचे महत्त्व कमी होऊ शकते.

मुख्यमंत्री शिंदे यांना अजित पवार यांच्या रूपाने तगडा प्रतिस्पर्धी तयार होणार.

शिंदे यांना स्वपक्षातील मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक आमदारांची नाराजी दूर करणे कठीण जाणार.

अजित पवार यांना ताकद देऊन शिंदेंना शह देण्याचा भाजप प्रयत्न करणार.

राष्ट्रवादीच्या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव. त्यातूनही शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

भाजपचा शिंदेंना तुम्ही नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट इशारा

जागावाटपात शिंदे यांची कोंडी होण्याची शक्यता

Ajit Pawar
Ajit Pawar: 'अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत तर...', ठाकरे गटाचा दावा

उपमुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड!

अजित पवार यांनी पाचव्यांदा घेतली शपथ यापूर्वी ते ११ नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा, त्यानंतर ७ डिसेंबर २०१२ ते २८ सप्टेंबर २०१४ या काळात चव्हाण यांच्याच मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदी होते.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गाजलेल्या सकाळच्या शपथविधीमध्ये त्यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या काळात ते २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ असे ३ दिवस उपमुख्यमंत्री होते.

पुढे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळात ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात ते चौथ्यांदा उपमुख्यमंत्रिपदी राहिले.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये रविवारी (ता. २ जुलै) त्यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

२०१९ च्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या तिन्ही सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.