Sachin waze case: परमबीर सिंग चंदीगडमध्ये?

महेश पांचाळ नावाच्या व्यक्तीला चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंग यांचे प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार दिला आहे.
Parambir-Singh
Parambir-Singhsakal media
Updated on

मुंबई : एक सदस्यीय निवृत्त न्यायाधीश कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या आयोगासमोर (chandiwal commission) सध्या परमबीर सिंग (parambir singh) यांच्यावरील आरोपांची सुनावणी सुरु आहे. वरिष्ठ वकील अभिनव चंद्रचूड आणि असिफ लाम्पवाला परमबीर सिंग यांच्यावतीने सुनावणीसाठी हजर होते. त्यांनी परमबीर सिंग यांनी बनवलेली पावर ऑफ अर्टॉर्नी सादर केली.

Parambir-Singh
नालासोपाऱ्यात मनसैनिकांना बेदम मारहाण; तिघांना अटक

ही पॉवर ऑफ अटॉर्नी चंदीगडमध्ये बनवण्यात आली आहे. यामध्ये महेश पांचाळ नावाच्या व्यक्तीला चांदीवाल आयोगासमोर परमबीर सिंग यांचे प्रतिनिधीत्व करण्याचा अधिकार दिला आहे. सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्या आलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

"जी माहिती उघड करणं आवश्यक आहे, ती सर्व माहिती परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयासमोर उघड केली आहे. मुख्यमंत्र्यांना २०-०३-२०२१ रोजी लिहिलेल्या पत्रात जी माहिती होती, त्यात आता जास्त काही वाढवण्यासारखं नाहीय" असे त्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पॉवर ऑफ अटॉर्नी चंदीगडमध्ये बनवण्यात आलीय. त्यावरुन ते चंदीगडमध्ये असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.