सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सोमय्या-फाईल प्रकरणी फडणवीसांचा संताप

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सोमय्या-फाईल प्रकरणी फडणवीसांचा संताप

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्रालयात जाऊन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल घेतली असून मुख्य सचिव यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता तीन जणांना करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन नियोजनकार आणि एक कक्ष अधिकारी अशा तीन जणांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले असून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली आहे. 'मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा संतप्त सवाल देखील त्यांनी केला आहे.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सोमय्या-फाईल प्रकरणी फडणवीसांचा संताप
सोमय्यांना फाईल दाखवणे पडले महागात; तीन जणांना कारणे दाखवा नोटीस

काल किरीट सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यात कक्ष १६ मध्ये आज गेले होते. तिथे ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स बघितल्या. कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स चेक करतानाचे किरीट सोमय्या यांचे हे मंत्रालयातील फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिले. त्या आदेशानंतर तीन जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय की, मविआ सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? माहिती अधिकारात फाईलचे निरीक्षण करण्यासाठी गेले तर त्यासाठी थेट माहिती मागणार्‍यालाच नोटीस! या अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली आहे. किरीट सोमय्यांना नोटीस कसली देता, ही नोटीस द्यायला सांगणार्‍या बोलवित्या धन्यावर कारवाई करा!

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सोमय्या-फाईल प्रकरणी फडणवीसांचा संताप
Survey : देशात मतदानाबाबत मत बदललं; 86 टक्के लोक म्हणतात...

पुढे त्यांनी म्हटलंय की, मंत्रालयातील प्रत्येक विभागात सीसीटीव्ही आहेत. हे फोटो कुणी काढले हे जरी शोधले तरी ते प्रसारित कुणी केले, हे सहज स्पष्ट होईल. पण, महाविकास सरकारचे डोके नेहमी उलटेच चालते. सरकारी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांना सुद्धा नोटीसा! हाच का तुमचा पारदर्शी कारभार? असा देवेंद्र फडणवीस यांनी सवाल केला आहे.

पुढे त्यांनी म्हटलंय की, शासनाच्या कार्यालयात जाऊन माहिती अधिकारात माहिती मागणे, फाईलचे निरीक्षण करणे, हा अधिकार सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दीर्घ लढ्यानंतर सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. एखादी प्रक्रिया माहिती नसेल तर ती जाणून घ्या. केवळ हुकूम सोडून कारवाई कसली करता? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सोमय्या-फाईल प्रकरणी फडणवीसांचा संताप
MP तील 'मिस्टर 26 जानेवारी' माहितीये का?; नावामागे आहे रंजक कहाणी

किरीट सोमय्या यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कार्यालयात घुसखोरी या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सचिन सावंत यांनी म्हटले होते. मंत्रालयात जाऊन फाईल्स तपासताना मी कोणत्याही गोपनीयतेचा भंग केलेला नाही. मी केवळ घोटाळेबाज नेत्यांची माहिती घेतली, असे स्पष्टीकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स चाळल्याची छायाचित्रे नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. तसेच मी कोणाच्या फाईल्स पाहिल्या, याची भीती काँग्रेसला का वाटत आहे, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com