तुमचा मुलगा सतत निराश असतो का? ‘या’ पारंपारिक खेळांची गोडी निर्माण करा, तो अभ्यासही करेल अन्‌ आनंदीही राहील

बालपणात गल्लोगल्लीत पावसाळा असो वा हिवाळा, प्रत्येक हंगामात खेळले जाणारे पारंपारिक खेळ आता दुर्लभ झाले आहेत. मुलांच्या हाती मोबाईल अन् समोर टीव्ही आल्याने मुलांच्या शारीरिक व्याधी लहानपणासूनच वाढत आहेत. मुले एकलकोंडी होऊन त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे.
Healthy Lifestyle Habits
Healthy Lifestyle Habitsesakal
Updated on

सोलापूर : बालपणात गल्लोगल्लीत पावसाळा असो वा हिवाळा, प्रत्येक हंगामात खेळले जाणारे पारंपारिक खेळ आता दुर्लभ झाले आहेत. मुलांच्या हाती मोबाईल अन् समोर टीव्ही आल्याने मुलांच्या शारीरिक व्याधी लहानपणासूनच वाढत आहेत. मुले एकलकोंडी होऊन त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे. स्पर्धेच्या काळात पैशाच्या मागे लागलेल्या अनेक पालकांनाही मुलांशी संवाद साधायला पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी प्रत्येक चिमुकल्यांना पारंपारिक खेळांचाच आधार वाटतो. त्याची आवड निर्माण करण्यासाठी शाळांनाही पुढाकार घ्यायला हवा. शारीरिक शिक्षण हा विषय केवळ गुणापुरता किंवा शिकविण्यासाठीच न ठेवता प्रात्यक्षिक ज्ञान मुलांना देणे काळाची गरज आहे.

१) सागरगोटे

सागरगोटे हा ग्रामीण भागातील भारतीय खेळ आहे. हा पारंपारिक खेळ मुले आणि प्रौढ दोघांमध्ये विशेषतः: महिला-मुलींमध्ये तो लोकप्रिय आहे. यात लहान दगडांचे ५ तुकडे (गजगे) असतात. या सोप्या खेळासाठी तुम्ही हवेत एक दगड फेकून फिरवावा आणि हवेतील दगड जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी जमिनीवरून इतर दगड उचलावेत. हवेतील गुट्टे जमिनीवर येईपर्यंत या प्रक्रियेची पुनरावृत्ती होते. जेव्हा हवेत एकापेक्षा जास्त दगड असतात तेव्हा प्रक्रिया अधिक अवघड होते. या पारंपारिक खेळाचे सौंदर्य त्याच्या साधेपणा आणि स्वस्तपणामध्ये आहे. शिवाय, कितीही लोक हा गेम खेळू शकतात.

२) गोट्या

लहान मुलांसह तरुणांचा आवडता हा खेळ आहे. ज्याला ‘कंचा’ही म्हणतात. या खेळात एक खेळाडू स्वतःचा एक हंटर (कंचा) वापरून निवडलेल्या गोटीवर लक्ष्य करतो. उजव्या हाताच्या आणि डाव्या हाताच्या तर्जनीमध्ये गोटी पकडलेली असते. बोट मागे खेचून जवळजवळ स्प्रिंग क्रियेत दाबाने तो सोडतो. खेळाडूला दुरूनच वर्तुळातील इतर गोट्यांवर लक्ष्य करावे लागते. दुसऱ्या आवृत्तीत, कांचा हा गोल्फच्या सूक्ष्म आवृत्तीप्रमाणे खेळला जातो. जेथे खेळाडूला त्याचा हंटर त्याच्यापासून काही यार्ड दूर असलेल्या छिद्रात (गल) पाठवावा लागतो. कोणत्याही पृष्ठभागावर आणि हवामानावर हा खेळ खेळला जातो.

३) जिबल्या

जमिनीवर चौकोन आखून किंवा चौकोनी फरशीवर उड्या मारुन हा खेळ खेळतात. एका-एका चौकोनात दगड (जिबली) टाकून लंगडीने प्रत्येक चौकोनात जायचे असते. डोक्यावर, हाताचा तळवा व दंडावर जिबली ठेवून खाली न पाहता त्या त्या चौकानात अचूक उड्या मारून सर्व चौकोन पूर्ण करावे लागतात. एक फेरी पूर्ण केली की तो चौकोन त्या त्या खेळाडूचा होतो. दुसऱ्या खेळाडूला त्यात पाय ठेवता येत नाही. या खेळात मुलांना उंच व लांब- लांब पाय टाकावे लागतात. त्यातून व्यायाम होतो आणि पायात ताकद वाढते.

४) चोर-पोलिस अन्‌ शिपाई

चोरचिठ्ठी या खेळात राजा, राणी, प्रधान, चोर, पोलिस असे पाच जण असतात. त्यात राजाला ५०, राणीला ४०, प्रधानाला ३०, पोलिसांना २० गुण तर चोराला काहीच गुण नसतात. या खेळाची सुरवात करताना वहीचे एक कोरं पान घ्यायचे. त्या पानाच्या पाच चिठ्ठ्या करायच्या आणि पानाच्या प्रत्येक चिठ्ठीवर राजा, राणी, चोर, पोलिस, प्रधान अशी नावं लिहायची. सर्व मुलांनी गोल करून बसायचे आणि एकाने सगळ्या चिठ्ठ्या एकत्र करून उडवायच्या. प्रत्येकाने आपापली चिठ्ठी उचलायची आणि ज्याच्या हाती ‘पोलिस’ चिठ्ठी येईल, त्याने सगळ्यांसमोर चोर चिठ्ठी असलेला ओळखायचा असतो. जर त्याने चोराला बरोबर ओळखले तर चोर चिठ्ठी असलेल्या काहीच गुण मिळत नाहीत. या खेळाच्या अशा अनेक फेऱ्या चालतात. पहिली फेरी संपली की, एका कागदावर सगळ्यांचे गुण नोंदवले जातात. सर्वात कमी गुण मिळलेला हरतो.

भविष्याचा वेध घेणारे पारंपारिक खेळ

बालपणापासून मुलांमध्ये मैत्रिपूर्ण संबंध विकसित करून त्यांच्यात सांघिक भावना विकसित करण्यात पारंपारिक खेळांचे फार मोठे योगदान आहे. त्या खेळांमुळे शारीरिक व्यायामातून शांत झोप, चिडचिडेपणा दूर होतो. त्यांच्या जिंकण्याची जिद्द, चिकाटी निर्माण होते. अनेक खेळातून आकडेमोडीची माहिती मिळते. उंच, लांब उड्यांमुळे मुलामुलींमधील समस्या दूर होतात. गोट्यांसह इतर खेळातून नेमबाजीत काहीजण तरबेज होता. अनेकजण डावपेच शिकतात,असे पारंपारिक खेळांचे महत्त्व असल्याचे शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विणा जावळे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.