Sharad Pawar: राजीनाम्याचा विषय संपला! आता पवार विरोधकांच्या एकजुटीत व्यस्त; म्हणाले...

शरद पवार यांनी बारामतीत आपल्या पुढील कार्यक्रमांची माहिती दिली.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal
Updated on

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार गेले चार दिवस राजीनाम्यामुळं चर्चेत राहिले, पण आता त्यावर पडदा पडला आहे. त्यानंतर आता मोदी सरकारविरोधात विरोधकांच्या एकजुटीच्या कामात ते व्यस्त आहेत. विरोधकांच्या एकजुटीबाबत त्यांनी आज बारामती इथं पत्रकारांशी बोलताना भाष्य केलं. (issue of resign is over Now Sharad Pawar busy with unity of opposition)

Sharad Pawar
Uddhav Thackrey: '...म्हणून मी केंद्राला बारसू संबंधीचं पत्र दिलं', उद्धव ठाकरे पत्रावर दिलं स्पष्टीकरण

पवार म्हणाले, युती करायची असेल तर विविध विचारांचे पण सामाईक कार्यक्रम घेऊन जर सर्व एकत्र येऊ शकले तर विरोधकांची एकजुट होईल. यासाठी आज नितीश कुमार काम करत आहेत आणखी काही लोकांचे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या सर्वांना सहकार्य करणं प्रोत्साहित करणं महत्वाचं आहे.

Sharad Pawar
Pramod Lokhande : 'नका करु नाद जयभीमवाल्यांचा' फेम गायक प्रमोद लोखंडे कालवश

पण हे लवकर केलं पाहिजे, कारण यामध्ये निवडणुकाचा उत्साह तयार होईल. कारण जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा सर्व लक्ष तिकडं केंद्रीत होतं, त्याच्यापूर्वी पर्यायी लोकांना आपण उभं करु शकलो तर त्याची आवश्यकता आहे. त्या कामात नितीश कुमारांसह आणखी काही लोक काम करत आहेत त्यांना सहकार्य करणं, प्रोत्साहित करणं, मदत करणं त्यात माझा सहभाग असेल, असं यावेळी शरद पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar
Uddhav Thackeray : प्रकल्पावरुन माघार घेतली नाही तर सरकार पडणार ; उद्धव ठाकरेंना विश्वास!

दरम्यान, शरद पवारांचं राजीनामानाट्य संपल्यानंतर आता ते राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. एकूणच पवारांचं राज्याच्या राजकारणात अशा विविध पद्धतीनं चर्चेत राहिले आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेससह, महाविकास आघाडी आणि देशपातळीवर विरोधकांच्या एकजुटीच्या कामात ते सक्रीय झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.