जबरदस्तीने वर्गणी वसूल करणे गुन्हा! ‘या’ कलमांअंतर्गत दाखल होईल खंडणीचा गुन्हा; उद्योजक अन्‌ ग्रामीण पोलिसांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप

सण, उत्सव, जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते, अशा अडचणी चिंचोली एमआयडीसीतील उद्योजकांनी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी जबरदस्तीने वर्गणी मागणे किंवा वसूल करणे गुन्हा असून असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
solapur
shirish sirdeshpandesakal
Updated on

सोलापूर : सण, उत्सव, जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी वसूल केली जाते, अशा अडचणी चिंचोली एमआयडीसीतील उद्योजकांनी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी जबरदस्तीने वर्गणी मागणे किंवा वसूल करणे गुन्हा असून असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

विनापरवाना कंपनीत प्रवेश करून जबरदस्तीने सण, उत्सव, जयंतीच्या नावाखाली वर्गणी वसूल केली जाते, अशी व्यथा चिंचोली एमआयडीसीतील उद्योजकांनी सोमवारी (ता. ८) पोलिसांसमोर मांडल्या. त्यासंदर्भात ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात बैठक पार पडली. यावेळी पोलिस अधीक्षक श्री. सरदेशपांडे म्हणाले, असा काही प्रकार होत असल्यास संबंधितांनी तत्काळ चिंचोली पोलिस चौकी किंवा मोहोळ पोलिस ठाणे, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच डायल ११२ या टोल फ्री क्रमांकावरून देखील मदत घ्यावी. अशा प्रकारांना आळा बसवून उद्योजकांना पोलिस विभागाकडून तत्काळ मदत मिळावी, यासाठी आता पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व उद्योजकांचा स्वतंत्र व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

यापुढे कंपनीत जबरदस्तीने प्रवेश करून सण, उत्सव, जयंतीच्या नावाखाली वर्गणी वसूल करताना आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी उद्योजकांना दिली. या बैठकीसाठी अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, मोहोळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, एमआयडीसी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. फाळके आदी उपस्थित होते.

‘या’ कलमाअंतर्गत दाखल होईल खंडणीचा गुन्हा

जबरदस्तीने वर्गणी मागणी करणाऱ्यांविरुद्ध तक्रार आल्यास चौकशीअंती संबंधितांवर आयपीसी कलम ३८३, ३८४ व ३८५ अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल होवू शकतो. कलम ३८३ व ३८४नुसार संबंधिताला तीन वर्षांपर्यंत तर ३८५ नुसार दोन वर्षांपर्यंत शिक्षा होवू शकते. त्यामुळे असा प्रकार कोणीही करू नये, असे आवाहन पोलिसांकडून सर्वांनाच करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.