Maharashtra Politics: 2024 ची लोकसभा निवडणुकीवर चंद्रकांत पाटलांचं भाकीत! भाजपचं ‘टेन्शन’ वाढणार

2024ची लोकसभा निवडणूक ही आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकी इतकी सोपी नसल्याचा दावा
Chandrkant Patil
Chandrkant PatilEsakal
Updated on

राज्यात महाविकास आघाडीत फूट पडणार आहे. त्यांच्या वज्रमूठीला भेगा पडल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. 2024च्या निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागांवर भाजप आणि शिंदे गट विजयी होईल असा दावाही भाजपकडून सातत्याने केला जात आहे. अनेक भाजप नेत्यांचा हा दावा सुरू होता.

मात्र अशातच या दाव्याला भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेद दिला आहे. त्यांनी 2024ची लोकसभा निवडणूक ही आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकी इतकी सोपी नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीचं ऐक्य तुटणार नाही, असं भाकीतही केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या रोखठोक वक्तव्यामुळे भाजप नेत्यांना टेन्शन वाढणार आहे.

Chandrkant Patil
Vasant More: वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार? सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य, म्हणाल्या...

शिरुर तालुक्यामध्ये भाजप बुथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी पुढील निवडणूक किती अवघड आहे हे स्पष्ट केलं. 2014 आणि 2019च्या निवडणुका बघता पुढील निवडणूक सोपी नाही. 2019 मध्ये आपल्यासोबत असलेले अघोषित होते. तेच आता 2024 मध्ये घोषित निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे आपल्या आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवावे लागणार आहेत. प्रभागात लक्ष द्यावे लागणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Chandrkant Patil
Shivsena: आदित्य ठाकरेंचं शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य म्हणाले, “शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे आणि मी…”

तर 2024च्या निवडणुकीत भाजप बहुमताने विजयी होईल. महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागांवर भाजप आणि शिंदे गट विजयी होईल असा दावाही भाजपकडून सातत्याने केला जात आहे. आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे.

Chandrkant Patil
Eknath Shinde: आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावर CM शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.