Maratha Andolan : ....तर ९९ टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणं कठीण; मराठवाड्यात केवळ ४ हजार १६० कुणबी नोंदी

Maratha Reservation
Maratha Reservation
Updated on

मुंबई - मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला सरसरकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी जरांगे पाटील आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नोंदी तपासण्यात येत आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत 'दिव्य मराठी'ने वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

Maratha Reservation
Uddhav Thackeray : उठाव करणारे फुगे नसतात ते योद्धा असतात; अब्दुल सत्तार यांच उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. यामुळे, मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १९६७ पूर्वीच्या नोंदी शोधण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

याअंतर्गत ३३ लाख ९८ हजार महसूल आणि शैक्षणिक अभिलेखांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ४ हजार १६० अभिलेखांत कुणबी नोंद आढळून आली आहे. याबाबत विभागीय आयुक्त मघुकरराजे आर्दड यांनी महिती दिली आहे.

Maratha Reservation
Yashomati Thakur : कास्ट सर्टिफिकेट खोटं, खासदार वहिनीच चोर निघाल्या; यशोमती ठाकूर यांची नवनीत राणांवर टीका

दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी घातलेली निजामकालीन वंशावळीची अट जीआरमधून काढली नाही, तर अभिलेखांनुसार ९९ टक्के मराठ्यांना कुणबीच्या आधारे आरक्षण मिळणं अशक्यप्राय होणार आहे.

प्रशासनाच्या वतीने आठ जिल्ह्यात हक्क नोंदणी, शेतवार पुस्तक, प्रवेश निर्गम उतारा आदी बाबी तापण्यात आल्या. अधिक नोंदी तपासण्यासाठी प्रशासनाचं एक पथक आज अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हैद्राबादला जाणार असल्याचं विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.