कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव !

कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाइन शाळांचा प्रस्ताव ! शाळाबाह्य, अनाथ मुलांचे भवितव्य अंधारात
School
SchoolMedia Gallery
Updated on

राज्यातील शाळाबाह्य मुलांचा फेब्रुवारी-मार्चमध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये तब्बल 29 हजार 204 मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. दहा हजारांहून अधिक मुलांनी पालकांसोबत राज्याबाहेर स्थलांतर केल्याचे स्पष्ट झाले.

सोलापूर : कोरोनामुळे (Covid-19) "शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू' हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने सुरू ठेवला. मात्र, अँड्रॉइड मोबाईलशिवाय ऑनलाइन शिक्षण अशक्‍य असून, हातावर पोट असणाऱ्यांकडे दूरचित्रवाणीसारखी माध्यमेही नाहीत. त्यामुळे मागील 16 महिन्यांपासून राज्यातील एकूण दोन कोटी चार हजार विद्यार्थ्यांपैकी अंदाजित 77 लाख मुले ऑनलाइन शिक्षणापासून (Online Education) दूरच राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे. (It is proposed to start offline schools in corona-free villages)

School
15 जुलैनंतर शिथिल होणार निर्बंध ! मुंबई लोकलसंदर्भात सावध भूमिका

राज्यातील शाळाबाह्य मुलांचा फेब्रुवारी-मार्चमध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये तब्बल 29 हजार 204 मुले शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. दहा हजारांहून अधिक मुलांनी पालकांसोबत राज्याबाहेर स्थलांतर केल्याचे स्पष्ट झाले. मुंबई उपनगरातील सर्वाधिक 10 हजार 28 मुले तर, पुणे जिल्ह्यातील तीन हजार 278, पालघरमधील 2 हजार 285, नंदूरबारमधील एक हजार 316, अकोल्यातील एक हजार 64, नाशिकमधील एक हजार 867 तर सोलापूर जिल्ह्यातील अडीचशे मुले शाळाबाह्य आहेत. हातावर पोट असणाऱ्या पालकांनी कोरोना काळात जिल्हांतर्गत व राज्याबाहेर उदरनिर्वाहाच्या निमित्ताने स्थलांतर केल्याची बाबही या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे घरातील कर्ता पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचीही संख्या साडेचार हजारांवर आहे. या मुलांसाठी गृहभेटी, स्वाध्याय अशा माध्यमातून शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, 16 महिन्यांच्या काळात राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे बोट दाखवत शिक्षण विभागाने मुलांना स्मार्टफोन तथा शाळांमधून ऑनलाइन शिक्षणाची सोय करून दिली नाही. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःच्या मोबाईलवरून ज्या मुलांकडे स्मार्टफोन आहेत, त्यांनाच शिकवले.

School
सोलापूर जिल्ह्यातील लस पुन्हा संपली !

जिल्ह्यातील सुमारे 700 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुलांसाठी या गावांमध्ये आता ऑफलाइन शाळा सुरू करता येतील का, यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचा प्रस्ताव 30 जून रोजी शासनाकडे पाठविला आहे.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शाळा आणि विद्यार्थ्यांची स्थिती

  • पहिली ते आठवीच्या शाळा : 1,06,491

  • एकूण विद्यार्थी : 1,46,87,493

  • नववी ते बारावीच्या शाळा : 22,204

  • एकूण विद्यार्थी : 56,48,028

45 टक्के मुलांकडे स्मार्टफोन नाहीत

राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 40 ते 45 टक्के मुलांकडे स्मार्टफोन तथा अँड्रॉइड मोबाईल नाहीत. या पार्श्वभूमीवर कोरोनामुक्त गावांमध्ये ऑफलाइन शाळा सुरू करण्यासंदर्भात संबंधित जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली. दरम्यान, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडून शाळाबाह्य मुले कोणत्या शाळेत दाखल केली, त्यांचे शिक्षण सध्या कशाप्रकारे सुरू आहे, याची माहिती मागविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.