Prakash Solanke: मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे माझे विरोधक होते; प्रकाश सोळंकेंचं भाष्य

Prakash Solanke: मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे स्थानिक माफिया होते; प्रकाश सोळंके यांचं भाष्य...
prakash solanke
prakash solankeEsakal
Updated on

मुंबई- आमदार प्रकाश सोळंके यांचे घर मराठा आंदोलनाच्या दरम्यान जाळण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोळंके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. माझ्या घरावर हल्ले करणारे काही समाजकंटक होते. त्यात स्थानिक माफिया मिसळले होते. घर जाळल्याच्या घटनेनंतर मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, असं वक्तव्य सोळंके यांनी केलं आहे.

सोळंके म्हणाले की, माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. ज्यांनी माझ्या घरावर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई केली जावी. सर्व सीसीटीव्ही फुटेज मी पोलिसांकडे दिले आहेत. घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये ४ ते ५ हजार लोकांचा समावेश होता. त्यातील २०० ते ३०० समाजकंटकांनी दगडफेक केली आणि माझे घर जाळलं. या समाजकंटकांकडे पेट्रोल बॉम्ब देखील होते. (It was the Maratha activists who saved my life the house burners were the local mafia mla Prakash Solanke on maratha reservation )

prakash solanke
Beed Maratha Reservation : जाळपोळ - दगडफेकीत बीड जिल्ह्यात नुकसान २० काेटींच्या घरात; सर्वाधिक फटका सोळंके - क्षीरसागरांना

राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी बांधिल आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं सोळंके म्हणाले. माझ्या घरावर हल्ला करणारे माझे विरोधक होते. त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब आणि दगडं देखील होती, असा दावा देखील त्यांनी केला.

prakash solanke
Sakal Podcast: मराठा आरक्षणासंदर्भात नेत्यांचे एकमत ते गेमिंग जगतातही इस्राइल-हमास युद्धाचे पडसाद

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाली आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर याच आंदोलनाच्या दरम्यान हल्ला झाला होता. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.