मुंबई : राज्यातील ओबीसी आरक्षण व इम्पेरिकल डेटावरून सुरू असलेले राजकारण अद्याप संपलेले नाही. एकमेकांवर बोट दाखवण्याचे काम सुरूच आहे. एकसारख्या आडनावामुळे मोठी अडचण होत आहे. योग्य प्रकार डेटा गोळा करणे गरजेचे आहे. उशीर झाला तरी चालेल; मात्र, काम योग्य होणे गरजेचे आहे, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. (It will work even if it is late; But the work needs to be done right OBC reservation Chhagan Bhujbal)
अशी अनेक आडनाव आहेत जे अनेक समाजात येतात. आडनावावरून जात ओळखणे अवघड होते. आम्ही ग्रामपंचायतींना आडनाव तपासून आकडा देण्यास सांगितले आहे. आयोगाने योग्य पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. तसेच योग्य प्रकार डेटा गोळा करणे गरजेचे आहे, असेही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
इम्पेरिकल डेटा (Imperial data) गोळा करण्याचे काम केंद्र सरकारचे आहे. हे काम राज्य सरकारवर टाकण्यात आले आहे. काम केले जात आहे. योग्य प्रकारे काम करण्यास सांगितले आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.
ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे निर्देश - वडेट्टीवार
डेटा गोळा करताना ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्रामपंचायती स्थानिक आडनावे जातिनिहाय तपासून डेटा देतील. याशिवाय नेमलेल्या कमिशनला योग्य सूचना दिली आहे. आडनावावरून नोंद करताना ग्रामपंचायतीसोबत माहिती पडताळण्याचे आदेश देण्यात आले आहे. ओबीसींचे कोणतही नुकसान आम्ही होऊ देणार नाही असे विजय वडेट्टीवार यापूर्वी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.