ExpressWay : दोन तासांसाठी आज मेगा ब्लॉक; ITMS प्रणालीचा होणार 'श्री गणेशा'

Mumbai Pune Expressway
Mumbai Pune ExpresswaySakal
Updated on

Mumbai Pune ExpressWay : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर वेळेत मदत पोहोचवण्यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर ITMS प्रणाली लावली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान सांगितले होते. त्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आज पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर 12 ते 2 या दोन तासांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. किवळे ते सोमटने यादरम्यान ITMS चे काम सुरू होणार असून, मेगा ब्लॉकदरम्यान वाहतूक जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे.

Mumbai Pune Expressway
Vinayak Mete Death : विनायक मेटे यांचा अपघात कसा झाला; नेमकं काय घडलं? VIDEO

मेटेंच्या अपघाती निधनानंतर या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रश्नावरून विरोधकांना पावसाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर या समस्येवर लवकर योग्य ती उपाययोजना करून ITMS प्रणाली लावली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्याचा एक भाग म्हणून आज याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प किवळे ते सोमटनेदरम्यान राबवला जाणार असून, 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणार आहेत.

Mumbai Pune Expressway
Video : विलासरावांनंतर बरोबर १० वर्षांनी मेटे यांच्यावर काळाने झडप घातली

ITMS प्रणाली आहे तरी काय?

आयटीएमएस म्हणजे हायवेवर किंवा रस्त्यांवर एचडी कॅमेरा बसवणे होय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर ठिकठिकाणी एचडी (हाय डेफिनिशन) कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हे कॅमेरा ३०० मीटर अंतरावर बसवलेले असतात. यामुळे एक्सप्रेस वेवरील कोणत्याही भांगातून चालकांच्या हालचाली कॅप्चर करता येतात. शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आयटीएमएस ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे.

यंत्रणा काम कशी करते?

यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर (ANPR) द्वारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक करावाई केली जाते. 40 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास त्याला दंड केला जातो. या यंत्रणेत कॅमेऱ्यांद्वारे वाहनांची नंबर प्लेट पाहून चालकाने मोडलेला नियम रेकॉर्ड केला जातो. ज्या दिवशी नियम मोडला, त्यादिवशी तारीख आणि वेळ असलेला फोटो थेट नियंत्रण कक्षाला पाठवला जातो आणि तिथून चालकाच्या पत्त्यावर दंडासाठी ऑनलाईन कारवाई केली जाते.

Mumbai Pune Expressway
Maharashtra Assembly : Ajit Pawar म्हणाले एक्सप्रेस वे आठ लेनचा करा

दरम्यान, याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) महापालिका संस्था असलेल्या 57 जिल्हा मुख्यालयी शहरांमध्ये लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शहरी व आंतरजिल्हा वाहतुकीचे प्रभावी संचालन आणि देखरेख करणे आवश्यक आहे. व्हिडीओ वॉलद्वारे वाहतुकीचे प्रभावी निरीक्षण केले जावे आणि वाहतूक कोंडी होऊ देऊ नये. यासाठी ही प्रणाली उपयोगी पडले अशी माहितीही त्यांनी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.