- नितीन बिनेकर
मुंबई : जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये पहाटे झालेल्या गोळीबाळात आरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टिकाराम मीना यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मीना कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टिकाराम मीणा २०२५ मध्ये निवृत्त होणार होते. मात्र त्यापुर्वीच सेवानिवृत्ती घेऊन आपल्या कुटूंबासोबत गावात सेटल होण्याचे इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता वडीलांचे हे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांची मुलगी पूजा मीना यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केली.
आरपीएफमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले टिकाराम मीना मूळचे राजस्थानच्या सवाई माधूपरमधील श्यामपुराचे रहिवासी. महिनाभरापुर्वी ते आपल्या गावी गेले होते. त्यावेळी घरच्यासोबत बोलताना टिकाराम यांनी आता चार-पाच महिन्यांनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतो. त्यांनतर सर्वासोबत गावीच राहणार आहे. असे सांगीतले होते.
टिकाराम यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. टिकाराम यांच्या पश्च्यात वडील रामकरण मीणा, आई भुरी देवी, पत्नी बर्फी देवी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा दिलकुशचे लग्न ठरले आहे. तर मुलगी पूजा हिचेही लग्न झाले आहे.
टिकाराम मीना हे मुंबईच्या आरपीएफ बॅरेकमध्ये राहत होते. विशेष म्हणजे टिकाराम मीना यांची मुलगी टिटवाळ्यात राहते. तिचे पती देखील रेल्वेत स्टेशन मास्टर म्हणून कार्यरत आहे. टिकाराम हे नेहमी आपल्या मुलीच्या घरी येत जात राहायचे
शेवटची भेट
६० वर्षी अब्दुल कादर मोहम्मद हुसेन ह्या गोळीबार मृत्यू झाला आहे. अब्दुल हे नालासोपारा इथे आपल्या पत्नीसोबत राहत होते. नालासोपारा इथे त्यांचे प्रोविजनल स्टोर चालवायचे. कादर यांना दोन मुले असून दोघेही दुबईला नोकरीवर आहे. पत्नी मोहोरमसाठी दुबईला गेली होती. तर अब्दुल कादर हे उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी मोहोरमनिमित्य गेले होते. मोहरम करून ते जयपूरहून मुंबईला परत येत होते. मात्र या गाडीत झालेल्या गोळीबाळात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत मृत्यू झालेले अख्तर अब्बास अली हे शिवडी इथे मजुरीचे काम करायचे. त्यांचे संपूर्ण कुटुंब जयपूरला राहते. कुटुंबियाना भेटून ते या गाडीने मुंबईत परत येत होते. ही त्यांची शेवटची भेट ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.