Jalna : अंबड शहरातील यशवंतनगरमध्ये चोरट्याचा धुमाकूळ

रोख रक्कमेसह,सोन्या,चांदीच्या दागिने मिळून सव्वा लाख रुपयांवर मारला डल्ला
Police
Police sakal
Updated on

अंबड : अंबड शहरातील यशवंतनगर येथे मंगळवारी(ता.21)येथील तलाठी ईश्वरदास अर्जुनराव पावसे यांच्या घरात भल्या पहाटे अडीच ते पावने तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने डल्ला मारत सोन्या,चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून 6 लाख 30 हजार रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,अंबड-पाचोड मार्गालगत असलेल्या भालचंद्र कुलकर्णी पेट्रोलपंपाच्या पाठीमागे असलेल्या यशवंतनगर येथील तलाठी ईश्वरदास पावसे यांच्या घरात मंगळवारी भल्या पहाटे अडीच ते पावने तीन वाजेच्या दरम्यान दरोडा घालण्याच्या तयारीने हातात काठ्या घेऊन एकत्र येत यातील फिर्यादी तलाठी पावसे यांच्या घराचे सेंट्रल लॉक तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याचा पावसे यांनी विरोध केला असता त्यांच्या डोक्यात तसेच डाव्या पायावर मारून जखमी केले.याचबरोबर साक्षीदार यांना धाक दाखवून घरातील कपाट तोडून साडे चार लाख रुपये रोख,पन्नास हजार रुपये किमतीचा एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस,पन्नास हजार रुपये किंमतीची एक तोळ्यांची सोन्याची पोत,पंचवीस हजार रुपये किंमतीचे पाच ग्राम चे कानातील सोन्याचे झुंबर,वीस हजार रुपये किंमतीचे

सोन्याची पोत,चार ग्राम डोरले तर आठ हजार रुपये किंमतीचे पायातील चांदीचे चैन,जोडवे मिळून 6 लाख 30 हजार रुपयावर अज्ञात सहा चोरट्याने डल्ला मारला आहे.याचबरोबर शेजारच्या घराच्या कडी कोंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याने केल.या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.राहुल खाडे,अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,परतुरचे मोरे,जालनाचे राजगुरू,

जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भुजंग,अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील,योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे,मारिया स्कॉट यांनी पहाटे सडे तीन वाजेच्या दरम्यान भेट दिली.यावेळी फिंगरप्रिंट,श्वानपथक यांना पाचारण करण्यात आले होते.

Police
Sambhaji nagar : नामांतरानंतर भडकले शहरात राजकारण

अंबड पोलीस ठाण्यात तलाठी ईश्वरदास पावसे यांच्या लेखी फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत आहे.अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली.

Police
Sambhaji nagar : उपायुक्त थेटे यांची इडीकडून चौकशी

शहरातील महालक्ष्मीनगर येथील अर्जुन माकोडे,यांच्या घराची कडी,कोंडा तोडून घरात प्रवेश केला.याचबरोबर अशोक खरात यांच्या घराचा कडीकोंडा तोडण्याचा प्रयत्न केला.मात्र दरवाजाला आतून पट्टया असल्याने चोरट्याचा प्रयत्न असफल ठरला.तर मोरिया कॉलनीतील ऍड.सातपुते यांच्या घरात प्रवेश करण्याचे त्यांच्या लक्षात आल्याने कोण आहे रे तिकडे असे ऍड.सातपुते यांनी आवाज देताच चोरटे पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.