जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (jalgaon district bank election) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील अनेक अर्जांवर हरकती घेण्यात आल्यानंतर त्यांची छाननी करण्यात आली. यामध्ये एकनाथ खडसे (Eknath khadse) यांची सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना दणका बसला आहे. यामुळे जळगावात भाजपला जबर धक्का बसला आहे.
जळगावात भाजपला जबर धक्का!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर विकास सोसायटीमधून बिनविऱोध निवडून येणार आहेत. अर्जातील त्रुटीमुळे सुनबाई रक्षा खडसे यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. बुधवारी (ता. २०) सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अर्जांवर सुनावणी सुरू होती. अद्याप यामध्ये किती अर्ज अवैध, वैध याची माहिती निवडणूक विभागातर्फे मिळू शकली नाही.
राष्ट्रवादीचाच एक्का... खडसेंच्या सूनबाईंचा अर्ज बाद
संचालकपदाच्या २१ जागांसाठी २७९ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात तीन जागा बिनविरोध झाल्या असून १९ जागांसाठी २१ नोव्हेंबरला निवडणूक होईल. ८ नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. बुधवारी अर्ज छाननी होऊन किती उमेदवारी अर्ज वैध, अवैध ठरले असते. मात्र, अनेकांनी बहुतांश उमेदवारांच्या अर्जावर हरकती घेतल्याने त्यावर सुनावणी सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध कार्यकारी सहकारी संस्था गटातून प्रत्येकी एक- एकच अर्ज आल्याने धरणगाव गटातून संजय मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील, एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील (शिवसेना) बिनविरोध झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.