नवी दिल्ली, ता.९ ः महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीवर नजर ठेवून केंद्रातील मोदी सरकारने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या जळगाव ते जालना या १७४ किलोमीटर लांबीच्या ७ हजार १०५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे प्रकल्पाला आज मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील दळणवळण गतिमान होणार असून पर्यटकांना अजिंठा आणि वेरूळ या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे आणखी सुलभ होणार आहे.