Maratha Reservation : संभाजीराजेंना उपोषण करावं लागलं, तेव्हा फडणवीसांनीच मराठा समाजाला..; आरक्षणाबाबत महाडिकांचं मोठं वक्तव्य

आजही महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
Devendra Fadnavis Dhananjay Mahadik Maratha Reservation
Devendra Fadnavis Dhananjay Mahadik Maratha Reservationesakal
Updated on
Summary

ठाकरे- पवार सरकारच्या काळात सारथीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे, छत्रपती संभाजीराजे यांना उपोषण करावे लागले होते.

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनीच कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले. त्याचा लाभ हजारो मराठा तरुण, तरुणींना झाला. राज्य सरकार आजही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले.

Devendra Fadnavis Dhananjay Mahadik Maratha Reservation
Maratha Reservation : आता कुणबी मराठा दाखला मिळणार, पण हवा 'हा' पुरावा; 'असे' मिळवा Caste Certificate

याबाबतचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठा निधी दिला गेला. या महामंडळाकडून आजवर सुमारे ५ हजार कोटींचे कर्ज वाटप झाले. त्याचा ६७ हजार तरुणांना फायदा झाला.

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू झाली. त्याचा फायदा ५८ हजारांपेक्षा अधिक मराठा (Maratha Community) विद्यार्थांना झाला. २०२२ पर्यंत या योजनेत ५०० कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis Dhananjay Mahadik Maratha Reservation
Maratha Reservation : 'कोल्हापुरात सभेसाठी येणाऱ्या अजित पवारांच्या गाडीखाली मी पहिली उडी मारणार'; कोणी दिला इशारा?

मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकासासाठी, तसेच स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी सहाय्य करण्यासाठी, फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली. सारथी संस्थेमार्फत आतापर्यंत सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांना, ४४. ५८ कोटी रुपये खर्च करून, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले.

Devendra Fadnavis Dhananjay Mahadik Maratha Reservation
Maratha Reservation : तुमच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा तत्काळ वटहुकूम काढा; सतेज पाटलांचं सरकारलाच चॅलेंज

रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवून, २७ हजार ३४७ मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला. एमफील व पीएच.डी.साठी २१०९ विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. सरकारतर्फे प्रतिविद्यार्थी २० लाख रुपये पाच वर्षांसाठी फेलोशीप म्हणून अनुदान दिले जाते.

Devendra Fadnavis Dhananjay Mahadik Maratha Reservation
Ichalkaranji Bandh : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; इचलकरंजीत कडकडीत बंद, तब्बल 430 कोटींची उलाढाल ठप्प

तर युपीएससीच्या तयारीसाठी मराठा समाजातील ५०० मुलांना, दरवर्षी दिल्ली आणि पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येते. ठाकरे- पवार सरकारच्या काळात सारथीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे, छत्रपती संभाजीराजे यांना उपोषण करावे लागले होते. आजही महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()