Jalna Maratha Protest : ''जालन्यात बिलकुल गोळीबार झाला नाही'' शिंदे गटाच्या मंत्र्याचा दावा

Jalna Maratha Protest
Jalna Maratha Protestesakal
Updated on

जालनाः जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामधील आंतरवाली सराटी येथे काल मराठा आंदोलनाला गालबोट लागलं. पोलिसांनी अमानुषपणे आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आंदोलक मनोज जरांगे यांनी गोळीबार झाल्याचं स्पष्ट केलं होतं. परंतु आज एकनाथ शिंदेंच्या एका मंत्र्यांनी गोळीबार झाला नसल्याचं सांगितलं आहे.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, काल जालन्यामध्ये जे काही झालं त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. या घटनेचं शासन म्हणून आम्ही कधीच समर्थन करणार नाही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई केली जाईल.

देसाई पुढे म्हणाले की, सर्वच पक्षांनी मराठा आरक्षण मिळावे, ही भूमिका घेतली आहे. काही मंडळी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये कोण कमी पडलं, काय झालं.. तेव्हा दिल्लीत बैठका घ्यायला पाहिजे होत्या का? यात मी जाणार नाही. आता महायुतीचं सरकार आलेलं आहे. पुन्हा पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आम्ही बैठक घेत आहोत.

Jalna Maratha Protest
Sharad Pawar : आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेच्या मागणीचं लोन; शरद पवारांनी केली मागणी

दरम्यान, कालच्या जालन्यातील घटनेमध्ये अजिबात गोळीबार झाला नाही, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केलाय. मात्र आंदोलकांनी गोळीबार झाल्याचं काल म्हटलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी तर आंदोलकांच्या मांडीवर गोळीबार झाल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र सरकारमधील एक मंत्री गोळीबार झाला नसल्याचं म्हणत आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Jalna Maratha Protest
ठाकरेंना सांगा मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणारा तुमच्या मांडीवर; शिरसाट यांची राऊतांवर टीका

शंभूराज देसाई काय म्हणाले?

  • मराठा आरक्षणासाठी क्युरिटो पिटिशनची प्रकिया सुरु आहे

  • मराठा समाजासाठी सारथीची केंद्र सुरु केलेली आहेत, त्यामुळे शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या

  • सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कशा सवलती देता येतील, याचा विचार सुरु आहे

  • काल सर्वांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळावे; याच भूमिकेत सरकार आहे

  • मराठा समाजात द्रारिद्र रेषेखाली किती आहेत, ही सर्व माहिती सुप्रीम कोर्टाच्या समोर यायला हवी

  • आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही नेत्याने राजकारण करु नये, राज्य सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे

  • पवार साहेबांनी हे पण पाहिलं पाहिजे की, फडणवीस काल बोलले.. लाठिचारर्ज झाला नसता तर पोलिसांची काय अवस्था झाली असती

  • अधिकृत स्थानिक प्रतिनिधींना विचारलं तर जास्त पोलिस जखमी आहेत, याचा अर्थ पोलिस परिस्थिती नियंत्रणात करण्याचा प्रयत्न करत होते

  • सामन्य लोकांपेक्षा पोलिस जास्त जखमी आहेत, अधिकृत माहिती लवकर देऊ, पत्रकारांवर पण हल्ला झाला, अशीही माहिती आलीय.

  • शरद पवार साहेबांना कोणी माहिती दिली, याची माहिती नाही

  • आंदोलन करणाऱ्यांसोबत चर्चा झाली होती, जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री बोलले होते. त्यामुळे पवार साहेब जे म्हणाले की, शब्द पाळला नाही ते चुकीचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()