Video : औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये आणखी एक दुचाकी पेटवली; व्हिडीओ व्हायरल

maratha reservation
maratha reservationesakal
Updated on

औरंगाबादः शुक्रवारी जालन्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. पोलिसांनी अमानुषपणे आंदोलकांवर लाठीहल्ला केला. त्यानंतर आंदोलकांनी अनेक एसटी बसेसचं नुकसान केलं. एकाने तर चार चाकी गाडी पेटवून दिली. दुसऱ्या एकाने दुचाकी पेटवली.

आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड येथे आणखी एक दुचाकी पेटवून देण्यात आलेली आहे. 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

maratha reservation
Friendship Day: 'फ्रेंडशिप' टिकवायची? बॉलीवूडचे 10 चित्रपट अजिबात चुकवू नका..

सिल्लोड येथील आंदोलनात दुचाकी पेटवून देणारे गोळेगाव खुर्दचे उपसरपंच अनिल बनकर आहेत. त्यांच्यासोबत आणखी मराठा बांधव घोषणाबाजी करताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

दरम्यान, आज राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटी येथे जात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी सराकरवर ताशेरे ओढत हे लोक तुम्हाला झुलवत ठेवत आहेत, असं म्हटलं आहे.

maratha reservation
Friendship Day : 'एक दिल दो जान'; सचिन अन् विनोद कांबळीच्या आयुष्यातील खास किस्से..

राज ठाकरे म्हणाले की, मी पूर्वीही म्हणालो होतो मराठ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते रद्द ठरवलं. सत्ताधारी लोक मराठा समाजाला फसवत आहेत, त्यामुळे कुठलंही आश्वासन देणार नाही. यासंबंधी अभ्यास करुन भूमिका मांडेल, असं ते म्हणाले.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर जरांगे पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टात जो आरक्षणाचा मुद्दा आहे, तो आपला विषयच नाही. हे आंदोलन मराठा समाजाला कुणबी असल्याचं प्रमाणपत्र मिळावं, यासाठी आहे. राज ठाकरेंना हा विषय माहिती नव्हता. त्यांनी माहिती घेतली असून याबद्दल अभ्यास करुन ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, दिवेसंदिवस मराठा समाजाचं आंदोलन पेट धरु लागलेलं आहे. काही शहरं बंद ठेवण्यात येत आहेत. कुठे जाळपोळ तर कुठे मोर्चे निघत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्णय घेतात, आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()