'मराठा तरुणाची आत्महत्या दुर्दैवी, संयमाने घ्यावं लागेल'

ashok chavan
ashok chavansakal
Updated on
Summary

जालन्यात आरक्षण नसल्यानं आत्महत्या करतोय अशी सुसाइड नोट लिहून मराठा तरुणाने जीवन संपवलं.

मुंबई - जालन्यात आरक्षण नसल्यानं आत्महत्या करतोय अशी सुसाइड नोट लिहून मराठा तरुणाने जीवन संपवलं. जालना जिल्ह्यातील परतूल तालुक्यातील सदाशिव शिवाजी भुंबर या २२ वर्षीय तरुणाच्या आत्महत्येनंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, जालन्यातील मराठा तरुणाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. आपल्याला संयमाने घ्यावे लागेल.

आरक्षणाबाबत बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आपल्याकडे मर्यादित पर्याय आहे. जेव्हा आरक्षणाचा विषय संसदेत आला तेव्हा 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर विषय सोपा झाला असता. हा विषय फक्त महाराष्ट्र किंवा मराठा, ओबीसी समाजापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशात हा विषय अडचणीचा बनला आहे.

ashok chavan
मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानवर आरोप

मराठा आरक्षण मिळावे ही शासनाची प्रामाणिक भूमिका होती. आपली रिव्ह्यू पेटिशन प्रलंबित आहे. तो पर्याय असतांना परत मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची वेळ नव्याने आली आहे. याला किती कालावधी लागेल हे मी सांगू शकत नाही मात्र सारथी च्या माध्यमातून समाजाला मदत केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जालन्यातील २२ वर्षीय तरुण हा एका खासगी कंपनीत कामाला होता. त्यानं इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला पण हवी तशी नोकरी मिळत नव्हती असं त्यानं सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. ओला दुष्काळ आणि मराठा आरक्षण नसल्यानं आत्महत्या करत असल्याचा उल्लेखही त्यात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.