Jalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांतील शिवार होणार जलयुक्त; दुसऱ्या टप्यातील कामांना मिळाली गती

Jalyukta Shivar 2.0
Jalyukta Shivar 2.0esakal
Updated on

Jalyukta Shivar : जलयुक्त शिवार लोकचळवळ बनवून मिशन मोडवर राबविणार असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यात जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्यास गती देण्याकरिता राज्य शासनातर्फे व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसमवेत सामंजस्य करार करण्यात आला.

त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. हॉटेल ताज येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री श्री रवीशंकर उपस्थित होते. याप्रसंगी राज्यात नैसर्गिक शेती करण्यासंदर्भात व्यक्ती विकास केंद्रासमवेत कृषी विभागाने देखील सामंजस्य करार केला.

Jalyukta Shivar 2.0
Jalyukta Shivar 2.0: आराखडा 204 कोटींचा; मंजुरी 29 कोटीला! नाशिक जिल्ह्यातील जलयुक्त शिवार 2.0 योजनेची स्थिती

‘जलयुक्त शिवार २’ मध्ये ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’च्या कामासाठी मृदा व जलसंधारण विभागाच्या वतीने सामंजस्य करारावर सचिव सुनील चव्हाण आणि व्यक्ती विकास केंद्र-आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था केंद्राचे अध्यक्ष प्रसन्न प्रभू यांनी स्वाक्षरी केली

. या कराराद्वारे राज्यातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, पालघर अशा २४ जिल्ह्यांतील ८६ तालुक्यात जलयुक्त शिवारची गाळ काढण्याची तसेच जल स्त्रोतांचे खोलीकरण, नद्यांचे रुंदीकरण, सिमेंट बंधारे बांधणे, शेत तळ्यांची कामे होणार आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांच्या कालावधीचा असेल.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज अनेक पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले.

सामंजस्य करून जलयुक्त शिवराच्या कामाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीची जोड देऊ शकलो ही मोठी गोष्ट आहे. मिशन मोडवर आम्ही ‘जलयुक्त शिवार २’ टप्पा राबविणार आहोत. जालना जिल्ह्यात वाटुरमध्ये मी गेलो असताना जलयुक्त शिवारमुळे झालेली किमया पाहिली असेही ते म्हणाले.

Jalyukta Shivar 2.0
Jalyukta Shivar Abhiyan 2.0 : 85 गावांतील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचेल पाणी

धरणांमधला गाळ काढणार
यावर्षी पाऊस ही कमी झाला आहे त्यामुळे अगदी योग्य वेळी हा जलयुक्त शिवारचा करार होतोय असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झालेला आहे. तेथील साठवणूक क्षमता वाढविण्यावर शासन काम करीत आहे. कॅन्सर सारखे रोग वाढत चालले आहे, त्यासाठी आपण सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे.
-------
जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या २२ हजार गावांमध्ये मोठे काम झाले. केंद्राच्या २०२० पाणी अहवालात महाराष्ट्रातील जलपातळी अन्य राज्यांच्या तुलनेत वर आल्याचा उल्लेख होता. यात आर्ट ऑफ लिव्हिंगचा सिंहाचा वाटा आहे. जलयुक्त शिवार दुसरा टप्पा राबवताना विषमुक्त शेतीचे अभियान हाती घेतले जाणार आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करणार आहोत.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Jalyukta Shivar 2.0
Jalyukta Shivar Yojana: दुरुस्तीच्या कामांतून शिवार कसे होणार पाणीदार! 9 कोटींपैकी अडीच कोटींची कामे मंजूर

गेल्या वर्षी १ हजार शेतकरी महाराष्ट्रातून बंगलोरमध्ये आले होते. ते त्यांच्या खर्चाने आले होते, त्यांचे उत्पन्न वाढले होते. ते धन्यवाद देण्यासाठी आले होते. योजनेला राजाश्रय मिळून लोकांचा सहभाग मिळाला आणि त्यामुळे जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली. प्रधानमंत्री मोदी यांनी स्वच्छ भारताची चळवळ सुरू केली आणि एक इतिहास निर्माण झाला हे उदाहरण आहे. या जमिनीत विषारी घटक टाकून टाकून तिला आपण निष्प्रभ करतो आहोत. त्यामुळे नैसर्गिक शेतीची गरज आहे.
- श्री श्री रवीशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

Jalyukta Shivar 2.0
Jalyukta Shivar Scheme : जलयुक्त शिवारसाठी 20 कोटी मंजूर; मृद व जलसंधारणच्या कामांना लवकरच प्रशासकीय मान्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.